नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे क्षत्रिय मराठा परिवार संघटनेतर्फे कोरोना महामारी काळात विशेष कामगिरी बजविणार्या विविध क्षेत्रातील कोरोना योध्द्यांचा सत्कार करण्यात आला.
नंदुरबार येथे क्षत्रिय मराठा परिवार संघटनेतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संघटन वाढीसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी कोरोना महामारी काळात विशेष कामगिरी बजाविणार्या विविध क्षेत्रातील कोरोना योध्द्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी
उत्तर महाराष्ट्र कार्यकारी प्रमुख ऍड. भाऊसाहेब पाटील, उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा प्रमुख अनिल कौतिक पाटील, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सागर भोसले, उत्तर महाराष्ट्र युवक प्रमुख रामकृष्ण बोरसे, ,जळगाव जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर भोसले, जळगाव जिल्हा सरचिटणीस गणेश पाटील, नंदुरबार तालुका अध्यक्ष राकेश बेहेरे आदी मान्यवर उपस्थीत होते.यावेळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील, गणेश सूर्यवंशी, पत्रकार शुभम डव्हके, पत्रकार कैलास चौधरी, पत्रकार अनिल परदेशी पत्रकार घनश्याम कलाल, पत्रकार भाऊसाहेब बच्छाव, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल अहिरराव, विशाल बोरसे यांचा यावेळी कोरोना योध्द्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन नंदुरबार जिल्हा विद्यार्थी प्रमुख यश पाटील व महिला दक्षता जिल्हाप्रमुख सौ.नीता पवार यांनी केले.