Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात एक दिवसीय उद्योजकता शिबिर उत्साहात

team by team
August 4, 2022
in शैक्षणिक
0
के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात एक दिवसीय उद्योजकता शिबिर उत्साहात

शहादा l प्रतिनिधी

आजच्या काळात प्रत्येकाला शिकून चांगली नोकरी प्राप्त करणे शक्य होत नाही. त्यामुळे कृषी पदवीधारकांनी नोकरीपेक्षा व्यवसायातून उत्पन्नाचा स्त्रोत कसा प्राप्त होईल याचा विचार केला पाहिजे.त्यासाठी अळंबी उत्पादन हा उत्तम व्यवसाय ठरू शकतो. पूर्णवेळ लक्ष केंद्रित करून परिश्रमाच्या जोरावर नोकरीपेक्षा अळंबी उत्पादन व्यवसाय चांगले उत्पन्न देऊ शकतो अशी माहिती कृषी व व्यवसाय तज्ञ घनश्याम पाटील यांनी दिली.

येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात ‘अळंबी उत्पादनातील संधी व आव्हाने’ या एकदिवसीय उद्योजकता शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल हे होते.

यावेळी श्री.पाटील यांनी अळंबी उत्पादनात येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय याबाबतीत मार्गदर्शन केले. व्यवसाय सुरू करतांना लागणाऱ्या गोष्टी, सरकारी योजना, विक्री,व्यवस्थापन, अशा विविध बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केले. कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या उद्योजकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पटेल यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. शिबिर यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा.विजय सपकाळ, प्रा. रुपेश पाटील, प्रा. मुकेश कोळी आदींनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात सायबर गुन्हे संरक्षण या विषयावर चर्चासत्र

Next Post

नंदुरबार येथे दोन गटात मारहाण, ३० जणांविरूध्द गुन्हा, दोघांना झाली दुखापत

Next Post
नंदुरबार येथे दोन गटात मारहाण, ३० जणांविरूध्द गुन्हा, दोघांना झाली दुखापत

नंदुरबार येथे दोन गटात मारहाण, ३० जणांविरूध्द गुन्हा, दोघांना झाली दुखापत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add