Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
August 4, 2022
in राज्य
0
नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’, तर 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपले घर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा, सर्व दुकाने, आस्थापनांनी या उपक्रम स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

 

‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, पोलिस उपअधीक्षक विश्वास वळवी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृति तेवत राहाव्यात, या लढ्यातील क्रांतिकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे. तसेच प्रखर देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी

 

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. यामहोत्सवांतर्गत सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालये, वसतिगृह, निवासस्थान, दुकाने, आस्थापनांवर या कालावधीत राष्ट्रध्वज तिरंगा ध्वज फडकवावा. प्रत्येक विभाग, उपविभाग, विद्यापीठ, महाविद्यालय, सर्व कार्यालयाच्या वेबसाईटवर,सर्व समाजमाध्यमावर दर्शनी भागावर ‘घरोघरी तिरंगा’ ही टॅगलाईन तसेच तिरंगाचे चित्र प्रदर्शित करावे. या संदर्भात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची वेळोवळी आढावा घेऊन प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात 3 लाख 75 हजार 900 घरे असून शहरी भागात 42 हजार 997 आणि ग्रामीण भागात 3 लाख 32 हजार 903 घरांचा समावेश असून एकूण 7 हजार 589 शासकीय, निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायत, शासकीय रुग्णालय, सहकारी संस्था असे मिळून जिल्ह्यात एकूण 3 लाख 83 हजार 489 घरांवर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. यासाठी 3 लाख 60 हजार 187 झेंडे जिल्हास्तरावरुन उपलब्ध होणार असून 19 हजार झेंडे हे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गावडे म्हणाले की, जिल्ह्यातील 595 पंचायतीमार्फत ग्रामस्तरांवर ‘घरोघरी तिरंगा ’ फडकविण्यासाठी 3 लाख ध्वजांची नोंदणी केली आहे. तसेच काही ध्वज सामाजिक दायित्व निधीतून घेण्यात येतील. ग्रामस्तरावर प्रभात फेरी, शालेय स्पर्धा, महिला बचत गट मार्गदर्शन, स्वच्छता मोहीम, महिला मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधन, देशभक्तीपर कार्यक्रम, स्वराज्य फेरी आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

 

जिल्हा परिषदेच्या इमारतीवर आकर्षक विद्युत दिवे लावण्यात येणार आहे. तसेच होर्डिगच्या माध्यमातून भारतीय ध्वज संहितेची माहिती देणारे होर्डिंग प्रत्येक ठिकाणी लावण्यात येणार असून ‘घरो घरी तिरंगा’ महोत्सवांचे काही गावांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. महिला बचत गट व स्थानिक विक्रेत्यांकडून जिल्हास्तरावर ध्वज उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

 

विविध समाजमाध्यमातून सदर अभियान राबविण्याबाबतची जनजागृती करण्यात येत आहे. शाळा व महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस विभाग व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यामार्फत अभियान यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पोलिस उपअधीक्षक विश्वास वळवी यांनी पोलीस विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती यावेळी दिली.

 

‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवितांना भारतीय ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वजाचा मान राखला जाईल व त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात येऊन उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गावडे यांनी यावेळी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप सुरु, शेतकऱ्यांनी नवीन ॲप डाऊनलोड करावे

Next Post

के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात सायबर गुन्हे संरक्षण या विषयावर चर्चासत्र

Next Post
के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात सायबर गुन्हे संरक्षण या विषयावर चर्चासत्र

के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात सायबर गुन्हे संरक्षण या विषयावर चर्चासत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add