Public
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public
No Result
View All Result

ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप सुरु, शेतकऱ्यांनी नवीन ॲप डाऊनलोड करावे

Mahesh Patil by Mahesh Patil
August 4, 2022
in राज्य
0
ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप सुरु, शेतकऱ्यांनी नवीन ॲप डाऊनलोड करावे

नंदुरबार l प्रतिनिधी

ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये काही महत्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल अॅप व्हर्जन-2 विकसित करण्यात आलेले आहे. हे सुधारित मोबाईल ॲप 1 ऑगस्ट 2022 पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी नवीन सुविधायुक्त ई-पीक ॲप डाऊनलोड करुन खरीप हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र शासनाचा ई-पीक पाहणी हा महत्वकांक्षी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येत असून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. गतवर्षी पासून ई-पीक पाहणी भ्रमणध्वनी ॲपद्वारे आतापर्यंत राज्यात सुमारे 1 कोटी 11 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी भ्रमणध्वनी ॲपमध्ये नोंदणी केली आहे. मागील खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करुन या प्रकल्पास उत्तम प्रतिसाद दिला आहे.

खरीप हंगाम 2022 ची ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे नोंदविण्याची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे. मागील वर्षभराच्या अनुभवावरुन व स्थानिक पातळीवरुन आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये काही महत्वाचे बदल करुन शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुटसुटीत मोबाईल ॲप व्हर्जन- 2 विकसित करण्यात आलेले आहे. सदरचे सुधारित मोबाईल ॲप 1 ऑगस्ट 2022 पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

ई- पीक पाहणी व्हर्जन -2 ॲप मधील नवीन सुधारणा

सुधारित मोबाईल ॲपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले असून शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करतांना पिकाचा फोटो घेतील त्यावेळेस फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्या बाबतचा संदेश मोबाईल ॲपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधांमुळे पिकाचा अचूक फोटो घेतला आहे किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.

शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयंप्रमाणीत मानण्यात येणार

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयं घोषणापत्र घेतले जाणार असून अशारीतीने शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयं प्रमाणित मानण्यात येऊन ती गाव नमुना नंबर 12 मध्ये प्रतिबिंबित होणार आहे.

तलाठी यांचेमार्फत होणार किमान 10 टक्के तपासणी

शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीपैकी 10 टक्के नोंदीची पडताळणी तलाठी यांचेमार्फत करण्यात येणार असून त्यामध्ये पिकाचा फोटो नसलेल्या नोंदी, चुकीचा फोटो असलेल्या नोंदीअंती विहित अंतराच्या बाहेरुन घेतलेले फोटो अशा नोंदीचा समावेश असणार आहे. तलाठी हे पडताळणी अंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करुन त्या नोंदी सत्यापित करतील व त्यानंतर त्या गाव नमुना नंबर 12 मध्ये प्रतिबिंबित होतील.

48 तासात खातेदारास स्वत: पीक पाहणी दुरुस्तीची सुविधा उपलब्ध

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदविलेली पीक पाहणी अशी पीक पाहणी नोंदविल्यापासून 48 तासामध्ये स्वत:हून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येणार आहे.

किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत पिकाच्या विक्रीसाठी संमती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध

किमान आधारभूत योजनेंतर्गत येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास ई-पीक पाहणी ॲपमध्येच शेतकऱ्याला “आपणास किमान आधारभूत किमान योजने अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करावयाची आहे काय.?” असा प्रश्न विचारला जाणार आहे. शेतकऱ्याने होय असा पर्याय निवडल्यास अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार असून त्याआधारे पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही.

मिश्र पिकांमध्ये मुख्य पिकांसह तीन घटक पिके नोंदविण्याची सुविधा

यापूर्वीच्या मोबाईल ॲपमध्ये मुख्य पीक व दोन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मागणीप्रमाणे एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दुय्यम पिकांचा लागवडीचा दिनांक, हंगाम व क्षेत्र नोंदविण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुय्यम पिकांची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

 

संपूर्ण गावाची पिक पाहणी पाहण्याची सुविधा

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्येच त्या गावातील खातेदारांनी नोंदविलेल्या पीक पाहणीची माहिती पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याद्वारे खातेदारांना पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास वेळेत तलाठी यांचेकडे अर्ज करणे शक्य होणार आहे.

ॲपबाबत अभिप्राय व रेटिंग नोंदविण्याची सुविधा

ई-पीक पाहणी व्हर्जन-2 मध्ये वापरकर्त्यांना ॲपबाबत त्यांचे अभिप्राय नोंदविण्याची सुविधा उपलबध करुन देण्यात आलेली आहे.

ई-पीक पाहणी ॲपमध्येच मदत बटनाची सुविधा

वापरकर्त्याला ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरताना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी ॲपमध्ये मदत हे बटन देण्यात आलेले आहे. या बटणवर क्लिक केल्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे देण्यात आलेली आहेत. तसेच ई-पीक पाहणी ॲपमधील कायम पड क्षेत्र नोंदविणे, बांधावरील झाडे नोंदविणे, पिकांची माहिती नोंदविणे, गावची पीक पाहणी पाहणे इत्यादी बाबतची माहिती देणाऱ्या दृकश्राव्य क्लीपच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. याचा वापर करुन शेतकरी ॲप वापरताना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतील. प्रत्येक खातेदाराने आपला पीक पेरा या ई पीक पाहणी ॲपद्वारे नोंदविणे गरजेचे आहे कारण ई पीक पाहणीच्या नोंदी या पीक विमा व पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्यप्रकारे मदत करणे इत्यादी बाबींसाठी आवश्यक असणार आहेत.

खरीप हंगाम 2022 चे पीक पाहणीची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे. यासाठी नमूद केल्याप्रमाणे सुधारित ई पीक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 गुगल प्ले स्टोअरवर ई- पीक पाहणी व्हर्जन-2 ॲप डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova. ही लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी हे सुधारित मोबाईल ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन खरीप हंगामातील पीक पाहणी वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन श्रीमती. खत्री यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

Previous Post

एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान  योजनेसाठी शेतकरी,जमीन मालकाने अर्ज सादर करावे

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी शेतकरी,जमीन मालकाने अर्ज सादर करावे

August 11, 2022
माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ’ स्पर्धेत सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ’ स्पर्धेत सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

August 11, 2022
लहान शहादा येथे वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जखमी

नंदुरबार येथे झोंबाझोंबी करणार्‍या दोघांविरूध्द गुन्हा

August 10, 2022
नंदुरबार येथून दुचाकी लंपास, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार येथून दुचाकी लंपास, अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल

August 10, 2022
आधार कार्डमुळे एकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

मालवाहतुक गाडीची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू

August 10, 2022
आदिवासी विकास प्रकल्पतर्फे जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली उत्साहात

आदिवासी विकास प्रकल्पतर्फे जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली उत्साहात

August 10, 2022

एकूण वाचक

  • 1,877,668 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group