Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा : पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी

team by team
April 12, 2022
in राजकीय
0
नंदूरबार जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा : पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील काही भागात कमी पर्जन्यमान झाल्याने काही गावांत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. यासाठी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाई निवारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जि.प.कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा ) संजय बाविस्कर, कार्यकारी अभियंता (लघु सिंचन ) निलिमा मंडपे, कार्यकारी अभियंता (बांधकाम ) सोमनाथ पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.उमेश पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी र.सो.खोंडे आदी उपस्थित होते.

ॲड.पाडवी म्हणाले, यावर्षी जिल्ह्यातील काही भागात कमी पर्जन्यमान झाल्याने काही गावांत टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी टंचाईग्रस्त गावांना टॅकरने पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करावे, विहीर अधिग्रहण प्रस्तावाला मंजूरी देण्यात यावी. पाण्याची पातळी भूगर्भात खूप खोलवर गेली असल्याने ज्या गावात टंचाई जास्त असेल तेथे बोअरवेल करावेत. पाणी टंचाईच्या गावाचे सर्व्हेक्षण करावे. ज्या ठिकाणाची हॅन्ड पंप नादुरुस्त असतील तेथील हॅन्ड पंपाची तातडीने दुरुस्ती करावी. टंचाईग्रस्त गावाचा प्रस्ताव मागवून ज्या ठिकाणी टँकरची मागणी असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पावसाळयापुर्वी नादुरुस्त पुलाची तसेच नवीन पुलाच्या ज्या कामांना मंजूरी दिले आहेत ती कामे पुर्ण करावी. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी गावाच्या ठिकाणी रस्त्यांच्या दोन्ही बाजुला उतारावर गटारी काढण्यात येवून तेथे शोषखड्डे तयार करुन त्या ठिकाणी पाणी भूगर्भात सोडण्याची व्यवस्था करावी. पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. निलगीराच्या झाडे अधिक प्रमाणात जमिनीतील पाणी शोषून घेत असल्याने अशा झाडांची लागवड न करण्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी.
जिल्ह्यात 63 हजार 372 लहान जनावरे तर 3 लाख 45 हजार 635 अशी एकूण 4 लाख 9 हजार 7 इतके जनावरे असून यासाठी दररोज 2 हजार 265 मेट्रींक टन इतका चारा दर दिवशी लागत असतो. सन 2021-2022 मधील खरीप ,रब्बी व उन्हाळी हंगामातील अपेक्षीत पीकपेरा नुसार साधारण 27 लक्ष 61 हजार मेट्रींक टन चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे. तसेच शासकीय योजनेतून मका व वैरण बियाण्यांचे वाटप करुन 507 हेक्टरवर चारा पीकाची पेरणी करणार असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.पाटील यांनी यावेळी दिली.
बैठकीत वन पर्यटन, पाणी टंचाई, चारा टंचाई, भूजल सर्वेक्षण, रोजगार हमी या विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीस सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर शहरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलतर्फे श्रीरामोत्सव उत्सव उत्साहात साजरा

Next Post

नवापूर येथे मध्यवती सहकारी बँक अंतर्गत आदिवासी विकास संस्थेच्या सभासदांना कर्ज वाटप

Next Post
नवापूर येथे मध्यवती सहकारी बँक अंतर्गत आदिवासी विकास संस्थेच्या सभासदांना कर्ज वाटप

नवापूर येथे मध्यवती सहकारी बँक अंतर्गत आदिवासी विकास संस्थेच्या सभासदांना कर्ज वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add