Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेलेल्या युवकास धुळे जिल्ह्यातून केली अटक, त्याच्यावर दोन खूनासह 24 गुन्हे आहेत दाखल

team by team
March 31, 2022
in क्राईम
0
होळीच्या दांडयाचा शेंडा कापल्याप्रकरणी पती पत्नीस मारहाण

नंदूरबार l प्रतिनिधी
सुरत येथील अल्पवयीन मुलीला नंदूरबार येथून
अपहरण करून पळवून नेलेल्या आरोपीतास धुळे जिल्ह्यातून अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार तालुक्यातील न्याहली येथील एकाकडे सुरत येथुन त्यांची 16 वर्षाची अल्पवयीन नात सुट्टयांमध्ये आजी – आजोबांकडे न्याहली येथे आलेली असतांना दि.29 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजे दरम्यान अल्पवयीन मुलीस सुरत येथील अक्षय शिंदे याने पळवून नेले म्हणून दि. 1 डिसेंबर 2020 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी संशयीत आरोपी अक्षय शिंदे रा . सुरत याच्याविरुध्द् अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता . सदर गुन्ह्याचा प्रारंभीचा तपास नंदुरबार तालुका पोलीस ठाणे यांच्याकडुन करण्यात येत होता , परंतु गुन्हा दाखल होऊन बराच कालावधी झाल्यानंतर देखील संशयीत आरोपी व अल्पवयीन मुलगी मिळुन येत नव्हती म्हणून पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा अंतर्गत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाकडे सोपवून संशयीत आरोपीतास तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या . अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष येथील सहा . पोलीस निरीक्षक नयना देवरे व त्यांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास केला असता असे लक्षात आले की , सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी अक्षय शिंदे याचे विरुद्ध गुजरात राज्यातील सुरत येथे शरीराविरुध्द् व मालमत्तेविरुध्दचे अनेक गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे व त्यागुन्ह्यांमध्ये फरार आहे . म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष येथील सहा . पोलीस निरीक्षक नयना देवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अमंलदारांचे एक पथक तयार करुन तात्काळ सुरत येथे रवाना केले . पथकाने संशयीत आरोपी याची संपूर्ण माहिती प्राप्त केली असता तो मुळचा महाराष्ट्रातील असून त्याचे बरेचशे नातेवाईक धुळे , जळगांव , नाशिक जिल्ह्यात राहत असल्याचे समजले . अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने सुरुवातीस जळगांव जिल्ह्यातील कासोदा येथे जावून संशयीत आरोपीच्या नातेवाईकांची माहिती प्राप्त केली परंतु संशयीत आरोपी अक्षय शिंदे हा काही दिवसांपूर्वी कासोदा येथे आला होता थोडे दिवस तेथे वास्तव्य करून तो कुठे निघून गेला याबाबत त्याच्या नातेवाईकांनी निश्चीत माहिती दिली नाही . पथक कासोदा येथे असतांना संशयीत आरोपी धुळे जिल्ह्यातील म्हसदी येथे असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली म्हणून पथकाने तात्काळ म्हसदी ता.साक्री गाठून
सुरुवातीला म्हसदी येथील धनदाई देवी मंदीर परीसरात व संशयीत आरोपीच्या नातेवाईकांची स्थानिक लोकांच्या मदतीने माहिती काढली व त्यांच्या घराच्या आजुबाजुला वेषांतर करुन सापळा रचला . नातेवाईकांच्या घरी कोणी अनोळखी मुलगा मुलगी आलेले आहेत का ? याबाबत माहिती काढली असता एक दोन दिवसापूर्वीच तेथे अनोळखी मुलगा व मुलगी आलेले आहेत अशी माहिती मिळाली . पथकाने अत्यंत योजनापूर्वक संशयीत आरोपीच्या नातेवाईकाच्या घराच्या आजुबाजुला सापळा रचला परंतु संशयीत आरोपी सराईत असल्याने त्यास पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने त्यास शिताफीने व गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले . संशयीत आरोपी अक्षय सुरेश शिंदे रा . वृंदावन पार्क , सुन्नी गाव , घर नंबर 60 , पलसाणा सुरत गुजरात याला अटक केली. पथकाने आरोपीताच्या नातेवाईकाच्या घरातुन अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका केली व आरोपीतास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी ताब्यात घेतले . आरोपी व गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगी यांना ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार येथे आणून आरोपीताबाबत रेकॉर्ड तपासले असता त्याच्यावर सुरत शहर व सुरत ग्रामीण येथे एकुण 24 गुन्हे दाखल असून 16 गुन्ह्यात तो फरार आहे . आरोपीतावर गुजरात राज्यातील कडोदरा पोलीस ठाणे येथे 2 खूनाचे , उमरा व कडोदरा येथे 2 गंभीर दुखापत करुन जबरी चोरी करणे तसेच पलसाण , लिंबायत , दिंडोली , अडाजण , सरथाना , जहांगीरपूरा , उमरा पोलीस ठाणे येथे चोरीचे 20 गुन्हे दाखल आहेत . अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाचे पोलीस अधीक्षक पी. आर . पाटील यांनी अभिनंदन करुन पथकास विशेष रोख बक्षीस जाहीर केले आहे . तसेच अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीची सुखरुप सुटका केल्याबद्दल नंदुरबार पोलीसांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहे . सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी. आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक विजय पवारयांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाचे सहा . पोलीस निरीक्षक नयना देवरे , सहा . पोलीस उप निरीक्षक भगवान धात्रक , महिला पोलीस नाईक अरुणा मावची , दादाभाई मासुळ , पोलीस अमंलदार दिपक न्हावी पोलीस नाईक मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात येणाऱ्यांसाठी एक एप्रिलपासून हेल्मेट सक्ती

Next Post

युवतीवर बलात्कार प्रकरणी शहादातील कॉफी हाऊस संचालकाला अटक

Next Post
युवतीवर बलात्कार प्रकरणी शहादातील कॉफी हाऊस संचालकाला अटक

युवतीवर बलात्कार प्रकरणी शहादातील कॉफी हाऊस संचालकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add