Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव बसस्थानकात आत्महत्या केलेल्या तरुणाची ओळख पटली, त्याच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती धक्कादायक

team by team
March 27, 2022
in क्राईम
0
प्रेम प्रकरणात धोका मिळाला असे लिहून बस स्थानकात युवकाने केली आत्महत्या

नंदुरबार l प्रतिनिधी
एक तर्फी प्रेमातून धडगाव बसस्थानकात गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाची ओळख पटली असून सदरचा तरुण अर्जुन विरजी पाडवी रा. डनेल ता.अक्कलकुवा असून सदर तरुण विवाहित असल्याची माहिती परिवाराने दिली.


धडगाव पोलीस स्टेशन क्षेत्रांतर्गत बाजारपेठेतील बस स्थानक प्रवासी शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे रात्री उशिरा नाव व गाव निष्पन्न झाले असून सदर मयत तरुणाचे नाव अर्जुन विरजी पाडवी असून तो अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा काठावरील डनेल सुजवापाडा येथील रहिवासी असल्याची माहिती तपास पोलीस अंमलदार राजेंद्र जाधव यांनी दिली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी सदर तरूणाने फरशीवर खडूने प्रेम प्रकरणातून आत्महत्या करत असल्याच्या आशयाची नोट लिहिली होती. मात्र त्याच्या परिवाराने दिलेली माहिती थक्क करणारी आहे. अर्जुन विवाहित असून त्याची पत्नी व त्याला तीन मुले असल्याची माहिती अर्जुनच्या परिवाराने दिली आहे. अर्जुनने लिहिलेल्या नोटमध्ये मुलीचा उल्लेख केला होता. मात्र अर्जुनच्या परिवाराला या मुली बद्दल काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
रात्री उशिरा अर्जुनचे वडील, काका व गावचे सरपंच आणि नातेवाईकांना अर्जुनचा मृतदेह ताब्यात देण्यात आला आहे. गळफास घेतलेल्या ठिकाणी एका मुलीला उद्देशून प्रेम संबंधी मजकूर अर्जुनने एकतर्फी प्रेमातून लिहून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे याबाबत धडगाव पोलीस स्टेशनात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून अधिक तपास धडगाव पोलीस करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रेम प्रकरणातून गळफास घेतलेल्या अनोळखी युवकाची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

Next Post

सुखद बातमी : नंदुरबार जिल्हयात पोलीसांकडून ३० ठिकाणी पाणपोईंची सोय

Next Post
सुखद बातमी : नंदुरबार जिल्हयात पोलीसांकडून ३० ठिकाणी पाणपोईंची सोय

सुखद बातमी : नंदुरबार जिल्हयात पोलीसांकडून ३० ठिकाणी पाणपोईंची सोय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add