Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार अहिर सुवर्णकार समाजातर्फे विधायक उपक्रम ,मंगळ बाधा व दोष निर्मुलनासाठी अमळनेर येथे विनामूल्य सामूहिक अभिषेक पूजन

team by team
March 21, 2022
in आरोग्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
सध्याच्या धावपळीच्या युगात वेळेअभावी शक्य न होणाऱ्या सामाजिक कार्याचा विडा नंदुरबार येथील सतीश प्रभाकर वानखेडे यांनी उचलला आहे. या नामीसंधीचा फायदा सुवर्णकार समाजबांधवांनी अवश्य घेण्याचे आवाहन नंदुरबार अहिर सुवर्णकार समाजातर्फे करण्यात आले आहे.
घर परिवार तसेच कुटुंबात किंवा आपल्या नाते संबंधात कोणी मंगळ बाधित मुलगा व मुलगी असेल त्यांची मंगळ ग्रहशांती व अभिषेक, जग प्रसिद्ध अशा अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील मंगळ ग्रह महाराज मंदिरात सामुहिकरित्या विनामुल्य करून घेण्याचे प्रयत्न असून याबाबत नियोजन सुरू आहे. यानिमित्ताने जी मंगळ बाधित मुले – मुली, थोडे दुर्लक्षित व उपेक्षित राहून गेले आहेत. त्यामुळे त्यांचे पालकही चिंताग्रस्त आहेत.
अशा सर्वांना एकाच ठिकाणी आणुन त्यांची मंगळशांती पुजा व आपसात ओळख परिचय घडवुन आणावा असा नम्र उद्देश नंदुरबार सोनार समाज कार्यकारिणी साकारत आहेत.
कार्यक्रमाच्या दिवशी चहा, नाश्ता व दुपारच्या जेवणाची व्यवस्था विनामुल्यच ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यासह परजिल्ह्यातील लांबच्या ठिकाणाहून येणार्‍या भाविकासाठी रात्रीचा मुक्काम व भोजनाची व्यवस्था देखील विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यासाठी एक लिंक असून त्या मार्फत मंगळ बाधित मुलांनी स्वतःचा फॉर्म भरून संयोजकाकडे पाठवायचा आहे. पूजेची ता. 25 एप्रिल 2022 सोमवार वेळ सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी सतीश प्रभाकर वानखेडे (8329075195, / 7620425913) राजेंद्र अभिमन्युशेठ जाधव (9823774535)
या भ्रमणध्वनी क्रमांकावर संवाद साधण्याचे आवाहन नंदुरबार अहिर सुवर्णकार समाज यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

देऊर, कमखेडा , टेंबा शिवारात उसाला लागलेल्या आगीत ५० एकरातील 11 शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक

Next Post

तारापुर येथे होळी पाहायला गेलेल्या युवकाचा खुनाचा गुन्हा अवघ्या 4 तासात विसरवाडी पोलिसांना केला उघड, तिघांना अटक

Next Post
तारापूर येथे होळी बघायला गेलेल्या युवकाचा अज्ञाताने केला खून

तारापुर येथे होळी पाहायला गेलेल्या युवकाचा खुनाचा गुन्हा अवघ्या 4 तासात विसरवाडी पोलिसांना केला उघड, तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add