Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीटचा पाऊस, केळी बागेचेसह रब्बी पिकांचे नुकसान, नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

team by team
March 8, 2022
in कृषी
0
शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीटचा पाऊस, केळी बागेचेसह रब्बी पिकांचे नुकसान, नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

नंदूरबार l प्रतिनिधी
हवामान खात्याने तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील , निंभोरा,कोंढावळ, खापरखेडा, बोराळे, काकरदा येथे वादळी वाऱ्यासह गारपीटचा पाऊस झाला. त्यामुळे या गावांमधील काढणीवर आलेले केळी बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

साधारणता काल दि.7 मार्च रोजी 4:30 वाजेच्या सुमारास जयनगरसह परिसरातील गावांमध्ये जोरदार वाऱ्यासह गारपीटचा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे केळी बागेसह, पपई, गहू, हरभराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गारपिटीच्या पावसासोबत जोरदार वाऱ्यामुळे परिपक्व झालेले घडसहित केळीची झाडे मोठ्या प्रमाणावर पडली आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे. पण हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला असून शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे.
अवकाळी पावसामुळे इतर रब्बी पिकेही वाया गेली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे, त्यांचे गहू आडवे पडले आहे. खरीप पिकांची कसर रब्बी पिकांमध्ये निघेल या आशेवर शेतकरी होता. मात्र अवकाळी पावसाच्या आगमनामुळे केळीसह गहू, हरभरा,पपई, कांदा, मिरची पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. म्हणून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यायला हवी. अशी मागणी जयनगरसह परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे जायंट्स ग्रुपतर्फे प्लास्टिक सर्जरी शिबीर

Next Post

पपई खरेदी करून ४७ लाख रुपये न देता पसार झालेल्या व्यापाऱ्याला दिल्ली येथून पोलीस व शेतकऱ्यांनी पकडले, न्यायालयाने दिली सात दिवसांची पोलीस कोठडी

Next Post
भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

पपई खरेदी करून ४७ लाख रुपये न देता पसार झालेल्या व्यापाऱ्याला दिल्ली येथून पोलीस व शेतकऱ्यांनी पकडले, न्यायालयाने दिली सात दिवसांची पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add