Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर तसेच चेक पोस्टवर आजपासून होणार नाकाबंदी प्रत्येक वाहनांची होणार तपासणी :पोलीस दलाची माहिती

team by team
January 5, 2022
in राज्य
0
नंदूरबार शहरात सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या पथकाची कारवाई, बँकेमध्ये असलेल्या वैयक्तिक लॉकरची केली तपासणी

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर तसेच चेक पोस्टवर आजपासून नाकाबंदी सुरु करण्यात आली असून प्रत्येक वाहनांची तसेच प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येणार आहे असे पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
दक्षिण अफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन वेरिएंटने संपूर्ण जगभरात चिंता निर्माण केली आहे . ओमायक्रॉनचा भारतात संसर्ग झाल्यामुळे भारतात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही अतिशय चिंतेची बाब आहे . कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे . खबरदारी म्हणून केंद्र व राज्य सरकार युध्द पातळीवर प्रयत्न देखील करत आहेत , त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्व खाजगी व सार्वजनिक ठिकाणी आता विना मास्क फिरण्यावर बंदी घातली आहे . तसेच मास्क न लावणाऱ्या व शासनाकडुन देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या लोकांना योग्य तो दंड वसुल करुन त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेश दिलेले आहेत .
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनी कडक निर्बंध लागू करण्याचे निर्णय प्रशासनाकडुन घेण्यात येत आहेत . कोरोना विषाणूची लढाई जनतेच्या सहकार्याने जिंकायची आहे त्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरुक राहून हा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे . संपूर्ण पोलीस दल आपले कर्तव्य पार पाडून कोरोना सारख्या अदृश्य शत्रूशी लढत आहेत . नंदुरबार जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर तसेच चेक पोस्टवर आजपासून नाकाबंदी सुरु करण्यात आली असून प्रत्येक वाहनांची तसेच प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येणार आहे . प्रत्येक व्यक्तीने कोविडच्या नियमाचे पालन करणे आवश्यक असून लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे . नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक समारंभाला तसेच कार्यक्रमाला प्रशासनाची परवानगी आवश्यक असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे . विना परवानगी तसेच सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन आढळल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल याची जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने नोंद घ्यावी . प्रत्येक व्यक्तीने शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे . वारंवार हात धुवा , मास्क वापरा , ६ फुट अंतरठेवा ” या त्रिसूत्रीचा वापर करावा . तसेच मास्कचा वापर न केल्यास दंडाची कारवाई सुरु करण्यात आली असूनही मोहीम काही दिवसात आणखी तीव्र करण्यात येणार आहे . पोलीस अधीक्षक कार्यालय , सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयव नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे येथे नागरीकांचे काही काम / तक्रार असल्यास नागरीकांना कोरोना विषाणूचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविणे अनिवार्य आहे . दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नसल्यास नागरीकांना प्रवेश दिला जाणार नाही तसेच अत्यंत महत्वाचे काम असल्यास नागरीकांनी बाहेर पडावे जेणेकरून विषाणूचा संसर्ग जास्त प्रमाणात वाढणार नाही असे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

लक्कडकोट वडफळी येथील खुन प्रकरणी आरोपीस नंदुरबार सत्र न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Next Post

नंदूरबार जिल्हयात आज आढळले ९ कोरोना पॉझिटीव्ह, तीन दिवसात आढळले २६ कोरोना रुग्ण

Next Post
नंदूरबार जिल्हयात आज आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

नंदूरबार जिल्हयात आज आढळले ९ कोरोना पॉझिटीव्ह, तीन दिवसात आढळले २६ कोरोना रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add