नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील रनाळे गावा लगत आज दि.३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता ट्रक अन् दुचाकीच्या झालेल्या भिषण अपघातात वावद येथील तरूण जागीच ठार झाला.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, वावद येथील गोपाल भटु गवळी (वय ४१) हा आपल्या दुचाकीने (क्र.एम. एच. ३९, अे. अे. ४९१०) ने रनाळेकडे जात होता. यावेळी अचानक रनाळ्याहुन नंदुरबारकडे कापसाने भरलेल्या ट्रक (क्र. एम. एच. १८, बी. जी. ७२७७) जबर धडक दिली. या अपघातात वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गोपाल भटु लगडे या युवकाचा करूण अंत झाला. दरम्यान, घटनास्थळी वावदसह नंदुरबार येथील समाज बांधवांनी धाव घेतली. रनाळेसह जिल्हा रूग्णालय येथील रूग्णवाहिकेशी वारंवार संपर्क करून देखील उशिरापर्यत रूग्णवाहिका उपलब्ध झाली नव्हती. यामुळे वावद ग्रामस्थांसह उपस्थित नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला. गोपाल लगडे यांच्या पश्चात आई, वडिल, काका, काकु, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, असा परिवार आहे. नंदुरबार येथील मुख्य पोस्ट कार्यालयातील कर्मचारी भटु गवळी यांच्या तो सुपूत्र होता.








