Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माझी वसुंधरा अभियान यशस्वी करावे : अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांचे आवाहन

team by team
December 31, 2021
in आरोग्य
0
माझी वसुंधरा अभियान यशस्वी करावे : अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
भावी पिढीच्या सदृढ आरोग्यासाठी भूमी , वायू ,जल , अग्नी व आकाश ही पंचमहाभूते संरक्षित ठेवणे ही काळाची गरज आहे . पंच महाभुते संरक्षणासाठी सर्व ग्रामस्थांनी लोकसहभागाच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी केले.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत बामखेडा त.त , व वडाळी ता. शहादा येथे आयोजित कार्यक्रमात अति .मुख्य कार्यकारी अधिकारी पवार बोलत होते . नंदुरबार जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियानांतर्गत निवड झालेल्या पंधरा ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सिमा वळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान यशस्वीतेसाठी विविध उपक्रम सुरु आहेत . या विविध उपक्रमांची पाहणी करण्यासाठी व आढावा घेण्यासाठी अति.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार , शहादा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी वडाळी व बामखेडा त.त.येथे भेट दिली. यावेळी पवार बोलत होते.ते पुढे म्हणाले की, निसर्गाचे संतुलन व पंचमहाभूतांचे संरक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करणे , जलसंवर्धन व जलप्रदूषण कमी करणे ,वनराई बंधारे शोष खड्डे यासारखे उपक्रम राबवावेत. ऊर्जा बचतीसाठी सौर दिवे ,एलईडी दिवे यांचा वापर वाढवावा. प्रदूषण रोखण्यासाठी बायोगॅस, सौर चूल यांचा वापर वाढवावा, प्लास्टिक बंदी करावी तसेच सांडपाणी व घनकचरा चे व्यवस्थापन करून गाव स्वच्छ व सुंदर करावे. यावेळी गट विकास अधिकारी घोरपडे यांनीही उपस्थित ग्रामस्थ व शासकीय कर्मचारी यांना अभियान यशस्वी करणेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने उपक्रम राबवून त्यांचे दस्तावेज कसे तयार करावेत याविषयी मार्गदर्शन केले .
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पवार, गटविकास अधिकारी घोरपडे यांनी वडाळी येथे ग्रामस्थ यांना तर बामखेडा तत येथील पी.एम. सी. माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाची शपथ देऊन माझी वसुंधरा अभियानाबाबत माहिती दिली . यानंतर वायू तत्वाअंतर्गत ग्रामस्थामध्ये ई वाहन वापराविषयी जनजागृती व्हावी यासाठी ग्रामपंचायत बामेखडा व जे.एम. मल्टी सर्विसेस शहादा यांच्या सयुंक्त विद्यमाने ‘ लावण्यात आलेल्या ई- वाहन डेमो स्टॉलची पाहणी करून. ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले . यानंतर ग्रामपंचायतीने लागवड केलेल्या वृक्ष लागवड , वृक्षांची करण्यात आलेल्या जीओ टॅगीग ,रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी कामांची पाहणी केली .याप्रसंगी बामेखडा सरपंच मनोज पाटील , महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी रणजित कुन्हे , बांधकाम उप अभियंता पावरा , विस्तार अधिकारी बी. एस. सूर्यवंशी, मनोज देव , जी. पी. कुलकर्णी . शाखा अभियंता एच. बी. भोई, वडाळीचे ग्रामविकास अधिकारी बी.बी . देसले, ग्रामेसवक मनिष रामोळे उप सरपंच उखा भिल , सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य आदीसह शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक , वैद्यकिय अधिकारी , अंगणवाडी सेविका, आशा वर्कर ,कर्मचारी आदीसह ग्रामस्थ .उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक युवक वेगळ्याच धुंदीत फिरतात, मात्र युवकांनी चक्क केली शहराची केली सापसफाई

Next Post

अधिवेशनात विद्यापीठ विधेयक पारित करुन घेतल्याच्या विरोधात भाजपा युवा मोर्चाने जाळल्या विधेयकाच्या प्रती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add