नंदुरबार ! प्रतिनिधी
आज दि.१० रोजी झालेल्या मुसळधार पावसात शिरपूर तालुक्यातील कुरखळी गावालगत शेतात विज पडून 2 जण ठार तर 2 गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे.
दोन आठवड्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाचे आज दुपारी जोरदार पुनरागमन झाले. ढगांचा गडगडाट आणि प्रचंड विजांसह पावसाला सुरुवात झाली. तासभर चाललेल्या या पावसाने शेतकरी काहीसे सुखावले असले तरी त्याने मनुष्यहानी ही केली आहे. वीज पडून दोघांचा बळी घेतला असून मनोज सुकलाल कोळी( वय 25)
सुनील सुदाम भिल (वय 30 ) दोन्ही रा. कुरखळी अशी मृतांची नावे आहेत.
तर समाधान बरकू भिल (वय 30 ) रवींद्र गुलाब भिल (वय 32) हे दोघे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे कुरखळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.