Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रेवानगर येथे तिन्ही कृषि कायदे रद्द झाल्याने किसान विजय दिवस साजरा

team by team
November 21, 2021
in राज्य
0
रेवानगर येथे तिन्ही कृषि कायदे रद्द  झाल्याने किसान विजय दिवस साजरा
तळोदा l प्रतिनिधी-
शेतकर्‍यांच्या गल्ली ते दिल्ली पर्यंत चाललेल्या या लढाईत पंजाब , हरियाणा प्रमाणेच परिसरातील असलेले नर्मदा बचाव आंदोलक व लोक संघर्ष मोर्चेकरी कार्यकर्त्यांनी केलेले अमूल्य योगदान सह कॉंग्रेसपक्षाचे नेते यांनी वेळोवेळी आंदोलनाला दिलेली ताकद व पाठींब्यामुळेच केंद्र सरकारने हे तिन्ही कायदे रद्द केले आहेत ,त्यामुळे हा विजय आपल्या सर्वाचा आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशचे उपाध्यक्ष तथा माजी मंत्री ऍड. पद्माकर वळवी यांनी केले. तळोदा तालुक्यातील रेवानगर येथे नर्मदा बचाव आंदोलन व कॉंग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारचे  वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे नुकतेच  रद्द केल्याची घोषणा केल्याबद्दल किसान विजय दिवस साजरा करण्यात आला.

देशभरातील विविध संघटनासह ,कॉंग्रेस पक्षाने मागील काही महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे रद्द व्हावे यासाठी चालवलेल्या लढ्याला अखेर केंद्र सरकारने नमते घेत  गुरुनानक जयंतीच्या पर्वाचे निमित्त साधून पंतप्रधानांनी कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा करून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे औपचारिकरित्या मागे घेतले जाणार असल्याची घोषणा केल्यामुळे देशभरातील विविध संघटनासह ,कॉंग्रेस पक्षातर्फे जल्लोष केला जात आहे.याच पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यातील रेवानगर येथे नर्मदा बचाव आंदोलन व कॉंग्रेस पक्षातर्फे शेतकर्‍यांच्या आंदोलनाला सक्रिय सहभागातून ताकद व पाठिंबा दिल्याबद्दल केंद्र सरकारला नमते व्हावे लागले व शेतकरी कायदे मागे घेण्यात आहे. यावेळी जलेबीच्या आस्वाद घेऊन जय जवान जय किसान ची घोषणा देत ढोलच्या तालावर नेते ,कार्यकर्ते यांनी ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ऍड.सिमा वळवी, जिल्हाकॉंग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक , तळोदा कॉंग्रेस अध्यक्ष रोहिदास पाडवी व शेतकरी आंदोलनात सहभाग नोंदविलेले मान्या पावरा आदी उपस्थित होते.यावेळी कॉंग्रेसचे तळोदा तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, मान्या पावरा, सुरेश इंद्रजित आदींनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष प्रविण वळवी, सदस्य धर्मेंद्र वळवी , प्रकल्प समिती  सदस्य योगेश पाडवी, प.स.सदस्य चंदन पवार, ऍड उमेश पाडवी,उपसरपंच चिमा पावरा, ग्रा.प.सदस्य निशा पावरा, भरत पावरा जि.प.शाळा उपाध्यक्ष गोविद पावरा, अर्जुन वळवी, प्रकाश ठाकरे,प्रविण शिंदे,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पावरा,जोमा पावरा, झिंग्या पावरा,नायका पावरा,लोठ्या पावरा,जिंबाना पावरा,आपसिंग पावरा,रमेश पावरा,सुकल्या पावरा,डेसा पावरा आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच हिरालाल पावरा यांनी केले तर आभार नाथ्या पावरा यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुकलाल पावरा,सबलाल पावरा,पोड्या पावरा,डोक्या पावरा,आण्या पावरा,आदींनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

भीमआर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद संविधान यात्रेनंतर कार्यकर्त्याच्या निवासस्थानी देणार भेट

Next Post

नवापूर – नंदुरबार रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक, भीषण अपघातात तीन युवक गंभीर जखमी

Next Post
नवापूर – नंदुरबार रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक, भीषण अपघातात तीन युवक गंभीर जखमी

नवापूर - नंदुरबार रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक, भीषण अपघातात तीन युवक गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add