Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भीमआर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद संविधान यात्रेनंतर कार्यकर्त्याच्या निवासस्थानी देणार भेट

team by team
November 21, 2021
in राज्य
0
भीमआर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद संविधान यात्रेनंतर कार्यकर्त्याच्या निवासस्थानी देणार भेट

नंदुरबार  l प्रतिनिधी
भीमआर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांची दि.23 नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथील पोलीस कवायत मैदानावर जाहीर सभा होणार आहे.त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत भीम आर्मीचे नंदुरबार जिल्हा प्रमुख संजय रगडे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित करून सदरची माहिती दिली आहे.
भीमआर्मीचे चंद्रशेखर आझाद यांचे नंदुरबार जिल्ह्यात आगमन होताच त्यांचे आदिवासी संस्कृती प्रमाणे स्वागत करण्यात येणार आहे. ते सुरत येथून सकाळी निघणार असून दुपारी 12.30 वाजेपर्यंत नंदुरबारात आगमन होणार आहे. यानंतर दुपारी दीड वाजेनंतर नंदुरबार शहरातील गणपती हॉटेल धुळे चौफुलीपासून कार व मोटर सायकल रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरातील शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे अंधारे चौक, आमदार कार्यालय, नगरपालिका, नेहरू चौक मार्गे पोलीस कवायत मैदानावर येवून रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. यानंतर दुपारी 3 ते 5 वाजेदरम्यान सभा घेण्यात येणार आहे. तसेच सभेनंतर भीम आर्मीच्या पाठशाळेला भेट देवून युवकांशी संवाद साधणार आहेत. तसेच भीम आर्मी जिल्हा संपर्क कार्यालयाचा शुभारंभ चंद्रशेखर आझाद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.यानंतर सायंकाळी तालुक्यातील पातोंडा येथील संघटनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते भैय्या पिंपळे यांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांच्या आईशी संवाद साधणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांशी बैठक घेवून मार्गदर्शन करणार आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

अवैध जात प्रमाणपत्र पडताळणी दाव्यांप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे सहसंचालकांचे आदेश, अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या मागणीला यश

Next Post

रेवानगर येथे तिन्ही कृषि कायदे रद्द झाल्याने किसान विजय दिवस साजरा

Next Post
रेवानगर येथे तिन्ही कृषि कायदे रद्द  झाल्याने किसान विजय दिवस साजरा

रेवानगर येथे तिन्ही कृषि कायदे रद्द झाल्याने किसान विजय दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add