Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

team by team
April 13, 2026
in क्राईम
0
नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार शहरातील तळोदा रस्त्यावरील ‘हॉटेल मंदाकिनी’ येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेत मॅनेजरचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाच संशयितांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर रमेश जाधव (वय २५, रा. रायसिंगपुरा, नंदुरबार) हा ‘हॉटेल मंदाकिनी’ येथे मॅनेजर म्हणून कार्यरत होता. ११ एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास काही संशयित हॉटेलमध्ये घुसले आणि जुन्या वादाच्या कारणावरून सागर जाधव याच्यावर हल्ला चढविला.

संशयितांनी “हॉटेल सुरू ठेवण्याची हिम्मत कशी केली?” असा जाब विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर कैलास पाडवी याने लाकडी दांड्याने सागर जाधव याच्या पोटावर, हातावर व डोक्यावर जबर मारहाण केली, तर विक्की राजपूत याने स्कॅनर मशीन डोक्यावर फेकून मारले. इतर आरोपींनीही हाताबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या भीषण हल्ल्यात सागर जाधव गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान पहाटे दोन वाजून पाच मिनिटांनी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी कुणाल मराठे यांच्या फिर्यादीवरून विक्की राजपूत, कैलास पाडवी, दीपक ठाकरे, निलेश ऊर्फ बंटी चौधरी आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

Next Post
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी 'बालकवच' किटचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

April 13, 2026
नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

April 13, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add