Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

team by team
April 13, 2026
in राजकीय
0
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

नंदुरबार l प्रतिनिधी-

जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या संगोपनासाठी “बाल कवच” हा उपक्रम आशेचा किरण ठरत असून, या उपक्रमांतर्गत नवजात शिशूंना मायेची ऊब देणाऱ्या किटचे वितरण करण्यात आले. संसदरत्न माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले.

कर्तव्य फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात डॉ. हीना गावित यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांना “बाल कवच” किट प्रदान करण्यात आले.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे रुग्णालयात प्रसूती झालेल्या प्रत्येक महिलेला डिस्चार्जच्या दिवशी हे किट पूर्णपणे विनामूल्य दिले जाते. या किटमध्ये बाळासाठी आवश्यक असलेल्या गादी, तकिया, मच्छरदाणी, ड्रेस आणि ब्लॅंकेट अशा अत्यावश्यक वस्तूंचा समावेश आहे, ज्यामुळे नवजात बालकांच्या आरोग्यदायी संगोपनाला मोठा हातभार लागत आहे.
या प्रसंगी नगरसेवक हिरालाल चौधरी, प्रतीक जैन, प्रितेश बांगड, आकाश बेदमुथा, शैलेश मुलानी, महेश रघुवंशी, विजय बांगड, राहुल पाटील, राजेश्वर चौधरी यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
“बाल कवच” उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना दिलासा मिळत असून, नवजात बालकांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

Next Post
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add