Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महावितरण कंपनीच्या उपकेंद्रात लागली भीषण आग, 80 गावांचा वीज पुरवठा खंडित

team by team
April 25, 2024
in क्राईम
0
महावितरण कंपनीच्या उपकेंद्रात लागली भीषण आग, 80 गावांचा वीज पुरवठा खंडित

नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील खांडबारा जवळ असलेल्या वाटवी गावाजवळील महावितरण कंपनीच्या उपकेंद्रात आग लागल्याने 80 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.आग आटोक्यात आणल्यानंतर दीड तासानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला होता.

खांडबारा जवळील वाटवी गावाजवळील महावितरण कंपनीच्या वीज उपकेंद्रात काल दि. 24 एप्रिल रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास विजेच्या शॉटसर्किट मुळे वीज उपकेंद्रात असलेल्या मीटरच्या ढिकार्‍याजवळ अचानक आग लागली परिसरात असलेला कोरड्या चारा मुळे आग परिसरात झटक्यात पसरली.

आग विझवण्यासाठी उपकेंद्रात कोणतीही अग्निशमन यंत्रणा नसल्याने आग विझवण्यासाठी एका कर्मचाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न केले. मिळेल त्या साधनाने परिसरातून व शेतातून पाणी आणून आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र हवेचा जोर असल्यामुळे आग विझवणे कठीण झाले होते. परंतु नंदुरबार जिल्ह्याचे ठिकाण केवळ 22 किलोमीटर अंतर वर असल्यावर देखील महावितरण कंपनीच्या वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अग्निशमन बंबाला संपर्क साधला नाही का ?

यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. आगीचे लोट दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून दिसून येत असल्यामुळे नागरिकांनी वाटवी येथील वीज उपकेंद्राजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महावितरण विभागाच्या या खांडबारा वाटवी विद्युत उपकेंद्र वरून जवळपास 80 गावांत विद्युत पुरवठा केला जातो मात्र या घटनेमुळे दीड तास पर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. तर आग आटोक्यात आणल्यानंतर दीड तासानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला होता.

या आगीच्या घटने दरम्यान महावितरण कंपनीच्या कोणतेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नाही तर स्थानिक नागरिक व एका कर्मचाऱ्याने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

यावेळी विद्युत उपकेंद्रातील आग विझवण्यासाठी वापरण्यात येणारे अग्निनिर्वापक यंत्र हे निकामी असल्यामुळे त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. त्यामुळे घटनास्थळी असलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला तर मिळेल त्या साधनाने पाणी आणून आग विझवण्यात स्थानिक नागरिकांनी मदत केली.

तर सदर ठिकाणी असलेले जुने मीटर व विद्युत वाहिन्या यांचे ह्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले यात हजारो रूपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.सुदैवाने जीवितहानी झाली नाही व पुढील अनर्थ टळला.

बातमी शेअर करा
Previous Post

महाविकास आघाडीतर्फे आज शक्तिप्रदर्शन, ॲड. गोवाल पाडवी दाखल करणार नामांकन

Next Post

नवापूरच्या पोलीस निरीक्षकांना 50 हजाराची लाच घेताना अटक

Next Post
नवापूरच्या पोलीस निरीक्षकांना 50 हजाराची लाच घेताना अटक

नवापूरच्या पोलीस निरीक्षकांना 50 हजाराची लाच घेताना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add