Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजूरी; मंत्री विजयकुमार गावित, खा. हिना गावित यांच्या प्रयत्नांना यश

team by team
February 6, 2024
in राजकीय
0
प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजूरी; मंत्री विजयकुमार गावित, खा. हिना गावित यांच्या प्रयत्नांना यश

नंदुरबार l प्रतिनिधी-
बऱ्याच वर्षापासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित
असलेली नंदुरबार तालुक्यातील प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला मंत्रालयीन स्तरावर व्ययअग्रक्रम समितीची रुपये ७९३.९५ कोटी किंमतीची म्हणजे सुमारे 800 कोटी रुपयांची प्रथम व सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.

आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार भेट घेऊन केलेल्या प्रयत्नांना आज प्रत्यक्षात यश लाभले असून तापी बुराई क्षेत्रातील गावकऱ्यांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमधून मोठा आनंद व्यक्त केला जाऊ लागला आहे.

या योजनेमुळे नंदुरबार तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील दुष्काळी भागाला तसेच शिंदखेडा व साक्री मधील दुष्काळी भागाला या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेमुळे नंदुरबार तालुकयातील निंभेल, कंद्र, होळतर्फ, रनाळे, हाठमोहीदा, कोपर्डी, आसाने, खोकराळे, घोटाणे, न्याहाली, बलदाने, भादवड, मांजरे, बहयाने, शनीमांडळ, तिलाली, तलावडे खु इत्यादी गावांना एकुण ४ हजार हेटक्र सिंचन क्षेत्राला तसेच शिंदखेडा व साक्री तालुक्यातील एकुण ३१०० हेक्टर सिंचन क्षेत्राला फायदा होणार आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावून विहिरीची भूजल पातळी वाढ मदत होऊन शेतकत्यांचे जीवनमान उंचावेल.

याच हेतूने आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ.विजयकुमार गावित आणि खा. डॉ. हिना गावित यांनी या योजनेचा सातत्याने पाठपुरावा चालवला होता. स्वतः मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन रखडलेल्या पाणी योजना विषयी सविस्तर चर्चा करून मार्गी लावण्याची विनंती केली होती त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना या प्रलंबित योजनेला न्याय देण्याचे आश्वासन दिलेले होते. मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलेल्या त्या प्रयत्नांना आज यश लाभले असून सुमारे 800 कोटी निधीची मान्यता प्राप्त झाली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मतिमंद बालिकेवर सामुहिक बलात्कार,तिघांना 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Next Post

ग्रामपंचायतीच्या विविध कामांची टक्केवारी भोवली, लाच घेताना ग्रामसेवकासह खाजगी इसमास रंगेहाथ अटक

Next Post
ग्रामपंचायतीच्या विविध कामांची टक्केवारी भोवली, लाच घेताना ग्रामसेवकासह खाजगी इसमास रंगेहाथ अटक

ग्रामपंचायतीच्या विविध कामांची टक्केवारी भोवली, लाच घेताना ग्रामसेवकासह खाजगी इसमास रंगेहाथ अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add