Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा तालुक्यात शिवसेनेचे प. स.त खाते उघडले

team by team
September 27, 2021
in राजकीय
0

नंदुरबार| प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यात दोन गटांसाठी २४ तर एका गणासाठी चार उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. पैकी आज जिल्हा परिषदेच्या गटासाठी १७ तर पंचायत समितीच्या तीन इच्छुक उमेदवारांनी माघार घेतली.त्यामुळे  जि.प.च्या दोन गटांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत.कोराई गणात तीन उमेदवारांनी नामांकन माघारी घेतल्याने शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध निवडुन आला आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी खापर व अक्कलकुवा या दोन गटांसाठी तर तालुक्यातील कोराई गणासाठी पोटनिवडणुक प्रक्रिया सुरू आहे. आज दि.२७ रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी खापर गटातून ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पैकी रमेश भूषण कामे, डॉ.सुप्रिया विजयकुमार गावीत, ललित जगदिश जाट, आमश्या फुलजी पाडवी, मंगलसिंग कोमा वळवी यांनी आपले नामांकन मागे घेतले त्यामुळे खापर गटात कॉंग्रेसतर्फे गिताबाई चांद्या पाडवी, भाजपातर्फे नागेश दिलवरसिंग पाडवी या दोघांमध्ये समोरासमोर लढत होणार आहे तर अक्कलकुवा गटासाठी सर्वाधिक १७ नामांकने दाखल करण्यात आले होते. पैकी रजिया बेगम मोहम्मद रफिक खाटीक, छायाबेन जितेंद्र चव्हाण, उषाबाई अमृत चौधरी, लक्ष्मी मनोज जैन, तबसुमबानो मोहसीनअली मक्राणी, फराहाणा सुफीयान मक्राणी, फिरोजाबी मक्राणी, बारीद बानो मक्राणी, ज्योती संदिप मराठे, सुनिता विश्‍वास मराठे, सलमा मोहम्मद जमील शेख, हशमी गुलनाज सलाउद्दीन या १२ जणांनी नामांकन मागे घेतले. त्यामुळे अक्कलकुवा गटात भाजपातर्फे वैशाली कपिलदेव चौधरी, राष्ट्रवादीतर्फे रेहाना बानो मोहसीन मक्राणी, कॉंग्रेसतर्फे सुरीयाबी अमीन मक्राणी, शिवसेनेतर्फे आशा पारस सोलंकी तर अपक्ष जानदेवी गुलाम कादर बलोच हे पाच उमेदवार अक्कलकुवा गटासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
कोराई गणातून शिवसनेचे खाते उघडले
अक्कलकुवा तालुक्यातील कोराई गणात चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पैकी सबु अंबर तडवी, मालती लक्ष्मण नाईक, इंदिराबाई तेडग्या वसावे यांनी आज नामांकन माघारी घेतल्याने शिवसेनेच्या अश्‍विनी दिलीप वसावे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्या विजयी झाल्या आहेत.

 

खापर गटासाठी दिग्गजांनी उमेदवारी केल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.आदिवासी विकास मंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालक मंत्री के.सी. पाडवी यांच्या बघिणीनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी केली आहे. तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नागेश दिलवरसिंग पाडवी हे रिंगणात उतरले आहेत.
खापर गटात शिवसेनेच्या ग्रामपंचायती असल्याने शिवसेनेचे वर्चस्व असतांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमश्यादादा पाडवी व युवासेना जिल्हा प्रमुख ललित जाट यांनी खापर गटासाठी उमेदवारी मागे घेतली आहे.त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना कोणाला मदत करते याकडे सर्व चे लक्ष लागून राहिले आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यात ४ गटांसाठी १२ तर गणांसाठी १३ उमेदवार रिंगणात,ऍड.राम रघुवंशी यांच्या अर्जावर हरकतीमुळे कोपर्ली गटात २९ रोजी माघार

Next Post

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील पोट निवडणुकीच्या प्रचार सभेकरिता इतकी संख्या हवी : राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

Next Post

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील पोट निवडणुकीच्या प्रचार सभेकरिता इतकी संख्या हवी : राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add