नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोट निवडणुकीच्या प्रचार सभेकरिता जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी देण्याबाबत कळविण्यात आले होती. तथापि , सार्वजनिक आरोग्य विभाग दि .११ ऑगस्ट , २०२१ रोजीच्या आदेशामध्ये ” विवाह सोहळे ” संदर्भात उपस्थिती बाबत दिलेल्या सूचना पाहाता , निवडणूक प्रचार सभा व रॅली मधील उपस्थिती संदर्भात पुढीलप्रमाणे कळविण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, खुल्या प्रांगणामध्ये होणाऱ्या निवडणूक प्रचार सभा, रॅली यांच्याकरिता उपस्थितांची संख्या प्रांगणाच्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्तींच्या मर्यादेत असेल . बंदिस्त कार्यालयातील प्रचार सभांमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्तींच्या मर्यादेत असेल .असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त अ.गो.जाधव यांच्या आदेशानुसार काढण्यात आले.