धडगांव ! प्रतिनिधी
कुकलट ता.अक्राणी जलसाक्षरता समितीच्या माध्यमातुन सुरु असलेल्या श्रमदानातून माती व जल संधारणाची कामे करण्यात येत आहेत.याची चांगली दखल विविध संघटना व सामाजिक संस्थांनी घेऊन प्रत्यक्ष सहभाग घेतला.
डॉ.एच.एच पाटील यांच्या आवाहनानुसार जलसंधारणाची व माती सुपोषणाच्या कामांची मजबुती वाढविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र ,नंदुरबार तर्फे स्टायलो हेमाटा या गवताची लागवड करण्यासाठी बियाणे पुरविण्यात आले. तसेच फुले दशरथ तसेच कोएफएस-२९ या बहुवर्षीय चारा पिकांचे बियाणे वाटप करण्यात आले व त्याच्या लागवडीची माहिती देण्यात आली. डोंगर उतारावर केलेल्या सी.सी.टी.व शेतात बांधावर हे गवत लावल्याने पाणी आणि मातीची धुप थांबणार आहे तसेच गूरांना पौष्टिकचारा उपलब्ध होणार आहे. कृषी विज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार ,.राजेश भावसार व अरुण कदम यांनी मार्गदर्शन केले.या प्रसंगी माजी सरपंच शिवलाल पावरा, सुभाष पावरा प्राचार्य डॉ.एच.एम.पाटील, सुभाष विठ्ठल पावरा व ग्रामस्थ उपस्थीत होते.