Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

team by team
March 14, 2026
in राजकीय
0
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

नंदुरबार l प्रतिनिधी

गॅस भरून वाहतूक करणाऱ्या ५० रिक्षा उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केल्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या रिक्षा चालकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांच्याकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रघुवंशी यांनी तात्काळ आरटीओ कार्यालय गाठत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि चालकांना दिलासा देण्याची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, उपप्रादेशिक परिवहन विभागाने अवैध गॅस वापरणाऱ्या रिक्षांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली होती. या कारवाईत सुमारे ५० रिक्षा जप्त करण्यात आल्या. हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांवर या कारवाईमुळे उपासमारीची वेळ आल्याने परिवहन कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

*रोजगाराचा प्रश्न आणि माणुसकीची साद*

रिक्षा चालकांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव व इतर निरीक्षकांसोबत बैठक घेतली. “जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने अनेक तरुण रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा कडक कारवाईमुळे त्यांच्यासमोर रोजगाराचा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टिकोनातून दंड कमी करून रिक्षा सोडण्यात याव्यात,” अशी भूमिका रघुवंशी यांनी मांडली.

*कायद्याचे पालन करण्याचे आवाहन*

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी रिक्षा चालकांनाही मोलाचा सल्ला दिला. “गॅस भरून रिक्षा चालवणे कायद्याने गुन्हा असून, यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. स्वतःच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरटीओच्या नियमांचे पालन करा आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा,” असे आवाहन त्यांनी केले.या शिष्टमंडळात नगरसेवक रवींद्र पवार, नगरसेवक पप्पू गिरासे, रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी किरण गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते.

रिक्षा चालकांवर आकसापोटी कारवाई नको; मंत्री प्रताप सरनाईक

उपप्रादेशिक परिवहन विभागाने आकसभावनेतून रिक्षा चालकांवर कारवाई करू नये असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्याची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.

नंदुरबार शहरात रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांच्या शिष्टमंडळाने आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे कैफियत मांडली. त्यानंतर आ.रघुवंशींनी थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत रिक्षा चालकांवर झालेल्या कारवाईची माहिती दिली. मंत्री सरनाईक यांनी देखील परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना रिक्षा चालकांवर कुठल्याही आकसापोटी कारवाई न करण्याच्या सूचना केल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Next Post

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

Next Post
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add