Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

team by team
March 14, 2026
in क्राईम
0
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी-

नवापुर औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या बनावट तूप निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल १ कोटी ४६ लाख ५६ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना नवापुर एमआयडीसी परिसरात बनावट तूप तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पंचांच्या उपस्थितीत संबंधित कारखान्यावर छापा टाकला.

छाप्यादरम्यान कारखान्यात राकेशभाई ईश्वरभाई भरतिया (वय ४७, रा. सुरत, गुजरात) हा इसम आढळून आला. तपासणीदरम्यान त्या ठिकाणी पामतेल, वनस्पती तूप तसेच विविध रासायनिक पदार्थ आणि फ्लेव्हरचा वापर करून गायीच्या तुपासारखा रंग व वास निर्माण करून बनावट तूप तयार केले जात असल्याचे उघड झाले.

तयार केलेले हे बनावट तूप ओरिया काऊ तूप, शुभ प्रीमियम काऊ तूप, लाभ काऊ तूप आणि राधे कृष्णा काऊ तूप या नावाने पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठविले जात असल्याचेही तपासात समोर आले आहे.

कारवाईदरम्यान पामतेल, बनावट तूपाने भरलेले डबे, विविध क्षमतेच्या साठवण टाक्या, पॅकिंग यंत्र, छपाई यंत्र, बॉयलर, विद्युत मोटारी, गॅस सिलिंडर, रासायनिक फ्लेव्हर, बीटा-कॅरोटीन तसेच इतर साहित्य असा १ कोटी ४६ लाख ५६ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी राकेशभाई भरतिया याच्याविरुद्ध कोणताही परवाना नसताना भेसळयुक्त व मानवी आरोग्यास घातक असे तूप तयार केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. व अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, तसेच पोलीस कर्मचारी मुकेश तावडे, मनोज नाईक, दादाभाई वाघ, विशाल नागरे, रमेश साळुंखे, सचिन वसावे, अभय राजपूत व रामेश्वर चव्हाण यांनी केली.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

Next Post

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Next Post
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add