Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महात्मा फुले यांचे अखंड वाचून अंनिसच्या पुढाकाराने पार पडला आंतरजातीय सत्यशोधकी विवाह

team by team
September 21, 2021
in सामाजिक
0
महात्मा फुले यांचे अखंड वाचून अंनिसच्या पुढाकाराने पार पडला आंतरजातीय सत्यशोधकी विवाह
नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने रविवारी नंदुरबार येथे आंतरजातीय सत्यशोधकी विवाह लावून देण्यात आला.जातीपातीच्याच्या भिंती तोडून महात्मा फुलेच्या अखंडाचे वाचन करत व संविधानाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत वैवाहिक जीवनाला सुरुवात करणाऱ्या या नवंदाम्पत्याने सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
        आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आंतर जातीय विविध करणाऱ्या दांपत्यांना सरकार कडून अनुदान देखिल देण्यात येते याशिवाय जाहिराती व पोस्टर, बॅनर द्वारे देखील जनजागृती केली जात आहे. मात्र आज ही समाजात आंतरजातीय विवाहांना पाहीजे तेव्हढि मान्यता दिसून येत नाही.आंतरजातीय विवाहासाठी उच्य शिक्षित समाज पुढे आहे. याच्यात प्रत्येक नंदुरबार मध्ये पार पडलेल्या आंतरजातीय सत्यशोधक विवाहामुळे पुन्हा एकदा आला आहे
        अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील युवक संजय दुसाद व नंदुरबार येथील युवती रिना निकुंभ या दोघांनी एकमेकांच्या पसंतीने आंतरजातीय विवाह करण्याचे ठरविले.त्याला दोघा परिवाराची देखिल संमती होती. संजयच्या गाड्या खरेदी विक्री च्या व्यवसाय आहे तर रीना ही परिचारिका म्हणून रुग्णालयात काम असून दोघेही स्वतःच्या पायावर उभे आहेत. आंतरजातीय व आंतरधर्मीय, सत्यशोधकी विवाह लावून देण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मोठे काम असल्याची माहिती या दोघांना मिळाली होती.त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र अंनिसकडे नंदुरबार शाखेकडे त्यांनी  अर्ज देऊन आंतर जातीय विवाह लावून देण्यासाठी मदत व मार्गदर्शनाची  विनंती अर्ज त्यांनी केली होती.
        दरम्यान, कायदेशीर व वैद्यकीय बाबींची पूर्तता केल्यानंतर महाराष्ट्र अंनिसच्या नंदुरबार शाखेच्या वतीने दोघंच्या विवाह सत्यशोधक पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला. महात्मा फुले यांचे अखंड वाचन, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले , डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संविधानाची प्रत यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून , मंगलगीत गायन केले नंतर एका कुंडीत दोघी दाम्पत्याच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून सीताफळाचे झाड लावण्यात आले. त्या झाडा भोवती सप्तपदी ( फेऱ्या) घेण्यात आल्या. प्रत्येक फेरीली नवदाम्पत्यकडून वचने वदवून घेतली दोघांच्या वैयक्तिक व सामूहिक शपथ ग्रहण करून घेतले, व दोघांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आली. अशाप्रकारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदुरबार शाखेच्या वतीने आगळा वेगळा व अत्यंत साधा पध्दतीने सत्यशोधकी विवाह लावून देण्यात आला .
       या विवाह सोहळ्याला वराचे व वधूच्या निवडक  कुटुंबीय व नातेवाईक देखिल उपस्थित होते.हा आंतरजातीय सत्यशोधकी विवाहासाठी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार अंनिस शाखेचे शांतीलाल शिंदे नाना, अँड.प्रियदर्शन महाजन, फिरोज खान, किर्तीवर्धन तायडे व वसंत वळवी, शहादा शाखेचे, संतोषभाऊ महाजन, प्रदीप केदारे यांनी परिश्रम घेतले.
अंनिसच्या वतीने ७०० हून अधिक विविध
          जातीपातीच्या बाबतीत आजही समाजात भेद अभाव दिसून येतो.जातीबाहेर लग्न केल्यामुळे अनेक कुटुंबांना वाळीत देखील टाकले जाते. जाठी एक मोठी अंधश्रद्धा म्हणून समाजातील जाती-पातीच्या भेदभाव नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह महत्वाचे माध्यम असल्याचे मानून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले जाते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आतापर्यंत राज्यभरात सातशेहून अधिक आंतरजातीय-आंतरधर्मीय व सत्यशोधक नोंदणी पद्धतीने विवाह लावून देण्यात आले आहेत.नंदुरबार शाखेच्या लावून देण्यात आलेला हा पहिला आंतरजातीय व सत्यशोधक विवाह होता.यापुढे देखिल अंनिसच्या वतीने जिल्ह्यात या क्षेत्रात काम केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला कायदेशीर वैद्यकीय व सर्व  बाबतीत मदत व मार्गदर्शन अंनिसच्या वतीने केले जात असून त्यासाठी महाराष्ट्र अंनिसचा स्वतंत्र विभाग त्यासाठी कार्यरत असल्याची माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी दिली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

बोदवड येथे अवैध सागवानी लाकुड जप्त

Next Post

नुकसानग्रस्त पिकांचे त्वरीत पंचनामा करण्यात यावा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Next Post
नुकसानग्रस्त पिकांचे त्वरीत पंचनामा करण्यात यावा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नुकसानग्रस्त पिकांचे त्वरीत पंचनामा करण्यात यावा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add