नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरात नवीन कृषि उत्पन्न बाजार समिती शॉपिंग सेंटर येथे राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद कार्यालय सुरु करण्यात आले असुन या कार्यालयाचे उद्घाटन माजी जि.प अध्यक्ष रजनी शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी पं.स सदस्य ललीताताई वसावे, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गावीत,जिल्हा उपाध्यक्ष वसंत गावीत,कोषाध्यक्ष राजेश गावीत,सचिव मोगराबाई पाडवी,सल्लागार अँड निलीमाताई गावीत,नंदुरबार तालुका अध्यक्ष मिराबाई पाडवी,नवापूर तालुका अध्यक्ष सफीरा गावीत,गुजराथ राज्यातील डॉग जिल्हातील सुबिर तालुका अध्यक्ष दानीयल ठिंगळ,युवक कॉग्रेस तालुका उपाध्यक्ष अश्विन वसावे आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद चे जिल्हाध्यक्ष प्रकाश गावीत म्हणाले की या राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद मार्फेत आम्ही गुन्हे आणि गुन्हेगारांन पासुन समाजाला मुक्त करणार आहोत तसेच समाज आणि देशपातळीवर जो भ्रष्ट्राचार सुरु तो आम्ही बंद करणार आहोत.
नागरीकांना कायद्याचा अधिकाराने योग्य न्याय मिळुन देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.समाजा मध्ये जो भाईचारा आहे. तो कायम करणार आहोत.महिलांसाठी विशेष करुन समाजा मध्ये आदर व सन्मान मिळुन देऊ समाजामध्ये पोलिसांचा बाबतीत जी भिती आहे ती मनातुन काढुन समाज आणि पोलिस यांच्या मधील ताळमेळ निर्माण करुन विधवा तसेच सर्व महिलांसाठी खास कायदे विशेषयक सल्ला आणि मोफत सोय उपब्लध करुन देऊ,प्रत्येक कार्यालयातील कोणत्याही प्रकारचे अपराध व गुन्हे संबधीत विभागातील अधिकारी यांना भेटुन अशा प्रकारचा गुन्हांना थांबविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
या नंतर माजी जि.प अध्यक्षा रजनी नाईक म्हणाल्या की, तुमचा काही समस्या असतील तर तुम्ही या राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद कार्यालयात येऊन मार्गदर्शन घ्यावे.बर्याच वेळी आपण न्यायलायात जातो त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन मिळत नाही तर तुम्ही या कार्यालयात विना शुल्क मार्गदर्शन मिळणार आहे. प्रत्येकाला माहिती व कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे यानंतर पं.स सदस्य ललीता वसावे,मिराताई पाडवी,गणेश मावची,उण्याभाई कागडे यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले.या वेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद चे जिल्हाध्यक्ष प्रकाश गावीत यांनी केला.या कार्यक्रमाचे सुञसंचलन राजेश गावीत यांनी केले तर आभार ॲड. निलीमा गावीत यांनी मानले.या राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद तर्फे दर शनिवारी दुपारी १२ ते २ दरम्यान प्रत्येक गरजुनसाठी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी आयोजकांनी दिली.








