Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चाळीस हजार रुपये किमतीचे अवैध सागवानी लाकूड जप्त

team by team
January 21, 2023
in क्राईम
0
चाळीस हजार रुपये किमतीचे अवैध सागवानी लाकूड जप्त

नवापूर | प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील भवरे व चिचलीपाडा-विसरवाडी रस्त्यावर वनविभागाच्या गस्ती पथकाने कारवाई करुन चाळीस हजार रुपये किमतीचे अवैध सागवानी लाकूड जप्त केले आहे.

भवरेवन विभागाच्या गस्ती पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीवरूने भवरे येथील कोकणी फळीतील जिल्हा परिषद शाळेजवळ जाऊन पाहणी केली असता शाळेच्या पाठीमागे  लपवलेली साग चौपाट नग ०६ दिसून आले. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त माल साग चौपाट नग ०६  घनमीटर ०. ३०० असून या मालाची बाजार भावानुसार अंदाजित किंमत ३० ते ४० हजार रूपये एवढी आहे. सदर कारवाई सदर कारवाई वनसंरक्षक होशिंग, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल, वनपाल भिवाजी दराडे, कल्पेश अहिरे, संतोष गायकवाड, गिरीश वळवी, वाहन चालक दिलीप गुरव यांच्या पथकाने केली.

दरम्यान, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क करावा असे आवाहन वनविभागाने केले आहे.
चिचलीपाडा-विसरवाडी तालुक्यातील चिचलीपाडा-विसरवाडी रस्त्यावर १० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड वनविभागाच्या गस्ती पथकाने जप्त केले आहे.

सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार व गणेश मिसाळ, वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी, वनक्षेत्रपाल श्रीमती स्नेहल अवसरमल व कर्मचारी तालुक्यातील मौजे चिचलीपाडा-विसरवाडी रस्त्यावर गस्त करीत असताना चिचलीपाडा गावात शेतात बेवारस साग नग १३, एकुण घ.मी.०.३२९ मिळून आले. सदर मालाची किंमत अंदाजे किंमत १० हजार असून सदर माल जप्त करून शासकीय वाहनाने नवापूर येथील शासकीय विक्री आगार डेपो येथे जमा करण्यात आला आहे.

सदर कारवाई सदर कारवाई विवेक होशिंग, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुजित बेडसे, शितल तोरवणे, वनरक्षक प्रवीण खैरनार, रामदास पावरा, सतीश पदमर, तुषार नांद्रे, आशुतोष पावरा, ईलान गावित, कल्पेश अहिरे, कमलेश गावीत, संतोष गायकवाड, कविता गावीत, वाहन चालक चांभार्‍या गावीत, दिलीप गावीत, बाळा गावीत, फिलिप गावीत यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे ४८ हजाराची चोरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

नंदूरबार येथील मंगल बाजारात दुकान फोडली, ३५ हजार रुपये लंपास

Next Post
नंदूरबार येथील मंगल बाजारात दुकान फोडली, ३५ हजार रुपये लंपास

नंदूरबार येथील मंगल बाजारात दुकान फोडली, ३५ हजार रुपये लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add