नवापूर | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील भवरे व चिचलीपाडा-विसरवाडी रस्त्यावर वनविभागाच्या गस्ती पथकाने कारवाई करुन चाळीस हजार रुपये किमतीचे अवैध सागवानी लाकूड जप्त केले आहे.
भवरेवन विभागाच्या गस्ती पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीवरूने भवरे येथील कोकणी फळीतील जिल्हा परिषद शाळेजवळ जाऊन पाहणी केली असता शाळेच्या पाठीमागे लपवलेली साग चौपाट नग ०६ दिसून आले. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त माल साग चौपाट नग ०६ घनमीटर ०. ३०० असून या मालाची बाजार भावानुसार अंदाजित किंमत ३० ते ४० हजार रूपये एवढी आहे. सदर कारवाई सदर कारवाई वनसंरक्षक होशिंग, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल, वनपाल भिवाजी दराडे, कल्पेश अहिरे, संतोष गायकवाड, गिरीश वळवी, वाहन चालक दिलीप गुरव यांच्या पथकाने केली.
दरम्यान, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क करावा असे आवाहन वनविभागाने केले आहे.
चिचलीपाडा-विसरवाडी तालुक्यातील चिचलीपाडा-विसरवाडी रस्त्यावर १० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड वनविभागाच्या गस्ती पथकाने जप्त केले आहे.
सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार व गणेश मिसाळ, वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी, वनक्षेत्रपाल श्रीमती स्नेहल अवसरमल व कर्मचारी तालुक्यातील मौजे चिचलीपाडा-विसरवाडी रस्त्यावर गस्त करीत असताना चिचलीपाडा गावात शेतात बेवारस साग नग १३, एकुण घ.मी.०.३२९ मिळून आले. सदर मालाची किंमत अंदाजे किंमत १० हजार असून सदर माल जप्त करून शासकीय वाहनाने नवापूर येथील शासकीय विक्री आगार डेपो येथे जमा करण्यात आला आहे.
सदर कारवाई सदर कारवाई विवेक होशिंग, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुजित बेडसे, शितल तोरवणे, वनरक्षक प्रवीण खैरनार, रामदास पावरा, सतीश पदमर, तुषार नांद्रे, आशुतोष पावरा, ईलान गावित, कल्पेश अहिरे, कमलेश गावीत, संतोष गायकवाड, कविता गावीत, वाहन चालक चांभार्या गावीत, दिलीप गावीत, बाळा गावीत, फिलिप गावीत यांच्या पथकाने केली.