नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील मंगळ बाजार परीसरातील महादेव पुजा भांडार या दुकानातुन अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडुन गल्ल्यातील ३५ हजार रोख लंपास केल्याची घटना घडली आहे.शहरातील भर बाजारात चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील नंदनगरी हाऊसींग सोसा.येथे राहणार्या देविसिंग भिका राजपुत यांच्या मालकीचे शहरातील मध्यवर्ती भाग असलेले मंगळ बाजार परीसरात महादेव पुजा भांडार नावाचे दुकान आहे.या दुकानात १७ जानेवार रात्री ८ ते १९ जानेवारी रात्री १० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने महादेव पुजा भांडार नावाच्रू दुकानाच्या शटरला लावलेले कुलुप तोडुन दुकानात प्रवेश करुन काउंटर टेबलचे ड्रायव्हरमध्ये ठेवलेले ३५ हजार रोख लंपास केले.याप्रकरणी देविसिंग भिका राजपुत यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोना बलविंद्र ईशी करीत आहेत.
दरम्यान नंदुरबार शहरातील मध्यवर्ती असलेल्या मंगळ बाजार परिसरात चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.दुकानाच्या हाकेवरच मंगळबाजार पोलीस चौकी आहे.चोरटयांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.