नंदुरबार l प्रतिनिधी
यातील नगरपालिकेच्या शाळेतील आदर्श शिक्षक डॉ. विजय गोपाल सोनवणे यांना जाहीर झालेला राष्ट्रीय प्रतिष्ठित नागरिक (व्यक्तिमत्व) पुरस्कार नुकताच एका कार्यक्रमात देण्यात आला.
जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय शिंदे, शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याखाता डॉ. रमेश चौधरी, तळोदा प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकृष्ण साबळे, नंदुरबार शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ. युवराज पाटील, भटू महाले यांच्या हस्ते डॉ. विजय सोनवणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमप्रसंगी मान्यवर उपस्थित होते.








