Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सारंगखेडा येथे राज्यस्तरीय समूह व एकल नृत्य स्पर्धा उत्साहात

team by team
December 26, 2022
in राज्य
0
सारंगखेडा येथे राज्यस्तरीय समूह व एकल नृत्य स्पर्धा उत्साहात
सारंगखेडा l प्रतिनिधी
            मनमोहक अदाकारी , ठूमके , ठसकेबाज धमाल , भन्नाट नृत्य अविष्कार सादर करून राज्यासह स्थानिक कलाकारांनी  नृत्य स्पर्धा गाजवली  . सारंगखेडा येथील चेतक फेस्टीव्हल मध्ये झालेल्या राज्यस्तरीय सामूहिक , एकल नृत्य व जिल्हा परिषद मराठी शाळा केंद्रातंर्गत सामुहिक नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या .
              येथील यात्रोत्सवानिमित्त चेतक फेस्टिव्हलच्या समारोप कार्यक्रमात राज्यस्तरीय सामूहिक , एकल नृत्य व जिल्हा परिषद मराठी केंद्रतंर्गत शाळेतील सामुहिक नृत्य स्पर्धा झाल्या . नृत्याच्या आविष्काराने चेतक फेस्टिव्हलच्या व्यासपिठावर शनिवारची रात्र नृत्यमय झाली होती . खानदेशी , आदिवासी , हिंदी , देशभक्ती , राजस्थानी , गुजराथी आदी नृत्यविष्काराने विद्यार्थी कलाकारांनी  उपस्थितांना मंत्रमुग्ध केले .नृत्य स्पर्धा पाहण्यासाठी मंचावर रसिकांची सर्वाधिक गर्दी झाली होती . राज्यातून आलेल्या युवक , युवतींनी केलेल्या प्रत्येक नृत्याने लक्ष खिळवून ठेवले होते . यावेळी  चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले .सरंपच पृथ्वीराजसिंह रावल , केंद्र प्रमुख वसंत जाधव , चंद्रशेखर पाटील , राजेंद्र तावडे , रमेश पाटील , संतोष मोरे ,शरद शिरसाठ , गणेश कुवर , आर .बी. राजपूत ,पुरुषोत्तम आगळे , प्रमोद जोशी , भरत धोबी , जाकीर खाटीक आदी उपस्थित होते .
      जिल्हा परिषद मराठी शाळेच्या समूह नृत्य स्पधेत प्रथम कळंबु शाळा  शिवचरित्र थीम डान्स , ;द्वितीय व तृतीय बिलाडी त . सा . शाळा . आदिवासी वादळ आले व तलवारो पे सर वारदे या शाळांचा सन्मान करण्यात आला .
 राज्यस्तरीय १४ वर्षे आतील एकल नृत्य स्पधेत प्रथम शिरपूर येथील हुनर डेमराणी , द्वितीय शिरपूर येथील अद्वैत पाटील ,तृतिय नंदूरबार येथील निलेश अग्रवाल , पंधरा वर्षा वरील एकल नृत्य मध्ये प्रथम सुरत येथील आकाश सोनवणे , द्वितीय शिरपूर येथील अक्षय सोनवणे , तृतीय खेतिया येथील सतीश साठे , तसेच १४ वर्षे आतील ट्रॅडिशनल एकल नृत्य प्रथम नंदूरबार येथील रक्षिता शर्मा , द्वितीय शहादा येथील आर्या चौधरी , तृतीय दोंडाईचा येथील गरिमा उज्येद्र  तर १५ वर्ष वरील ट्रॅडिशनल एकल नृत्य नाशिक येथील अरविंद लोखंडे , द्वितीय सुरत येथील तेजस यादव तृतीय दोंडाईचा येथील निमिषा खडसे , राज्यस्तरीय समूहनृत्य प्रथम मुंबई येथील रंगीला डान्स ग्रुप , द्वितीय धुळे एम .जे. डान्स व नंदूरबार ग्लोरीयस गर्ल्स बॉईज यांना विभागून देण्यात आला.परीक्षक म्हणून सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर टोबे फर्नाडिंस , कुश बनकर , अभिनव गुसेन यांनी काम पाहिले . सुत्रसंचालन दिनेश कोयंडे यांनी केले .
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार ते दोंडाईचा रस्त्यावर सहा लाखाच्या ट्रकसह मोबाईल लांबविला

Next Post

आदर्श शिक्षक डॉ. विजय सोनवणे यांचा राष्ट्रीय प्रतिष्ठित नागरिक पुरस्काराने सत्कार

Next Post
आदर्श शिक्षक डॉ. विजय सोनवणे यांचा राष्ट्रीय प्रतिष्ठित नागरिक पुरस्काराने सत्कार

आदर्श शिक्षक डॉ. विजय सोनवणे यांचा राष्ट्रीय प्रतिष्ठित नागरिक पुरस्काराने सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add