नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे एनएसई व इंडियन सोसायटी ऑफ अग्रीबिजनेस प्रोफेशनल यांच्या संयुक्तरित्या सामाजिक उतरदायित्व निधीच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी देण्यात आलेले 7 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये , जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन बोडके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी संस्थेचे कौतुक केले. यासाठी संस्थेचे प्रोजेक्ट हेड दीप्ती महाजन दिल्ली, प्रकल्प व्यवस्थापक परशुराम आंबरे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच डॉ.राजेंद्र आगळे, तालुका समन्वयक बाळासाहेब घुले, विशाल घरटे , हरिष मोरे , लक्ष्मण माळी, दिनेश वसावे , निकिता टेकाळे , अनिल लोहार यावेळी उपस्थित होते.