नंदुरबार l प्रतिनिधी
माजी महसूल मंत्री,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकनाथराव खडसे तसेच प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या वाढदिवस निमित्त जिल्हाभरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नंदुरबार जिल्हा कार्यालयात गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत दिलीपराव मोरे यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.नवापुरात प्रभाग क्र.३ व ८ मध्ये वृक्षारोपण आणि मिष्ठान्न वाटप झाले. शहादा येथे महाआरती करण्यात येऊन प्रसादाचे वाटप करण्यात केले. तळोदा येथे वृक्षारोपण करण्यात आले. अक्कलकुव्यात पैलवानबाबा दर्ग्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चादर चढवली तर धडगावात प्रमुख कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात येऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळांचे वाटप केले.
कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, युवा नेते ॲड राऊ मोरे,जिल्हा उपाध्यक्ष, शांतीलाल साळी, नगरसेवक नरेंद्र नगराळे,नगरसेविका सविता नगराळे,मीनल लोहार,जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार,अलीम मकरणी,बी.के पाडवी,जिल्हा चिटणीस जितेन्द्र कोकणी, जिल्हा अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष ॲड.दानीश पठाण,शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, नगरसेवक हमीद अन्सारी,शहादा तालुकाध्यक्ष माधव पाटील,नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, नंदुरबार तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील,योगेश मराठे,तळोदा तालुका अध्यक्ष डाॅ. राजपूत, नवापूर शहराध्यक्ष शरद पाटील नागपूर तालुका अध्यक्ष सुरेश कोकणीमहिला जिल्हाध्यक्ष ॲड.अश्विनी जोशी,युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संजय खंडारे,सेवादल जिल्हाध्यक्ष रवींद्र जावरे, सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे, युवक जिल्हा उपाध्यक्ष छोटू कुवर,महीला जिल्हा उपाध्यक्ष हंसा अहिरे,नवापुर तालुकाध्यक्ष हेमलता गावित,महिला कार्याध्यक्षा दीपांजली गावित,नंदुरबार शहर युवक अध्यक्ष लल्ला मराठे,उपाध्यक्ष पंकज पाटील,राजा ठाकरे,युवक तालुकाध्यक्ष सुरेश वळवी,मिलिंद जाधव,रुपेश जगताप,हेमंत बिरारे,निलेश चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.