Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बिजरी अंतर्गत येणाऱ्या गोऱ्या गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची गावकऱ्यांची मागणी

team by team
September 2, 2021
in सामाजिक
0
बिजरी अंतर्गत येणाऱ्या गोऱ्या गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची गावकऱ्यांची मागणी

धडगाव l प्रतिनिधी

ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या बिजरी अंतर्गत येणाऱ्या गोऱ्या गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी धडगांव तहसिलदार श्री.सपकाळे,   व गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की,  बीजरी या ग्रुप ग्रामपंचायतीत एकुण ७ गावे येतात. ६ गावात ग्रामसभा होते. मात्र गोऱ्या या गावात पेसा ५ टक्के निधीची मिटिंग का होत नाही.ग्रामकोष समिति तयार करण्यासाठी देखील मिटिंग झाली नाही. व मागील १०वर्षाचा निधी खर्च झालेला नाही.यासाठी शासन, प्रशासन यांना वारंवार निवेदन दिले असुन या बाबत दुर्लक्ष होतांना दिसून येते.गावाचा विकास करण्यासाठी आलेला पेसा 5 टक्के निधी खर्च तर केला नाही मग हा १० वर्षाचा निधी शासनाला परत केला का कोणाच्या खिशात जमा झाला.यासाठी  गोऱ्या गावात कोविडचे-19 नियमाचे पालन करून पेसा निधीचे नियोजनासाठी विशेष ग्रामसभा घेऊन गावातील मुलभुत प्रश्न सोडवावे. गावाच्या विकासासाठी आलेला पेसा निधी खर्च होत नाही.अनुसूचित क्षेत्र विस्तार अधिनियम १९९६ तसेच वनहक्क अधिनियम २००६ या कायदयाद्वारे आदिवासी ग्रामसभेला विशेष अधिकार देण्यात आलेले असून आदिवासींच्या विकासासाठी दरवषीँ ५ टक्के पेसा निधी उपलब्ध करून दिला जातो.परंतु ग्रामसभाच होत नाही मग निधी कसा खर्च केला जातो? सदर १० वर्षाचा निधी खर्च झालेला नाही.सदर लक्षात घेता अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीतील वाडया, वस्त्या, पाडयांना स्वतंत्र ग्रामसभा घेणेस बंधनकारक आहे.यासाठी गोऱ्या गावात राजकीय दबाव असल्यामुळे गावात पेसा मिटिंग होत नाही का ? गावात काम न करता निधीचा अपहरण झालेला आहे का? आदी माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी व गावाचा विकास व्हावा यासाठी गोऱ्या गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर रुपसिंग पराडके, मालतीबाई पराडके, आपसिंग पराडके, दिलीप पराडके, पेंजराबाई पराडके, पालसिंग पराडकेे, गुलाब पराडके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

आय.एस. ए. पी. संस्थेकडून जिल्हा रुग्णालयाला यांना 7 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट

Next Post

नंदुरबार येथे नागरिकांनी खड्यांमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या यंत्रणेचा पुतळा गाडून केले आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add