तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी कालपासून सुरू असलेल्या बंद कृती समितीच्या वतीने सुरु केलेले होता ते “असहकार आंदोलन” तूर्त स्थगित करण्यात आले आहे.
शहादा विभागातील व तळोदा उपविभागातील सर्व लाईन स्टाफ बांधवांनी ऑनलाईन पद्धतीने १९ ऑक्टोंबर पासून सार्वजनिक रजा भरून बेमुदत असहकार आंदोलन सुरू केलेले होते.सदर या आंदोलनासाठी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मंडळ नंदुरबार, यांनी आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी कृती समितीच्या वरिष्ठ पदाधिकारींना बोलविण्यास आले होते व संपा संदर्भात चर्चा करण्यात आली होती.
परंतु वरिष्ठ अधिकारी अक्कलकुवा उपविभाग येथे मिटिंगसाठी निघून गेल्यामुळे कृती समितीच्या संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी तळोदा उपविभाग येथे कार्यकारी अभियंता , शहादा विभाग, यांच्याशी सकारात्मक चर्चेअंती “असहकार आंदोलन” तुर्त स्थगित करण्यात आले आहे.
आंदोलन तूर्त स्थगित केल्याने सर्व लाईन स्टाफ बांधवांनी ऑनलाईन रजा रद्द करून लगेच कामावर रुजू झालेत. कामगारांनी दिपावली सण असल्याने व वीज ग्राहकांना दिपावली सणामध्ये विजेची तांत्रिक अडचण येऊ म्हणून सदर कर्मचाऱ्यांनी आपल्या मनाचा मोठपणा दाखवून आंदोलन तूर्त स्थगित केले.
भविष्यात अशा घटना घडू नये याची खबरदारी घेतली जाईल, अधिकारीही कर्मचारी यांच्या अडचणी समजून घेतील, यासाठी आपण सर्वांनी कंपनीला व संघटनेला सहकार्य करावे. असेच सर्वांनी एकजूट रहावे, संघटना कायम आपल्या पाठीशी आहे.
सदर आंदोलनाच्या चर्चेसाठी आपल्या संघटनेचे झोन अध्यक्ष सुनील पाटील, झोन सहसचिव गुलाबराव पवार, सर्कल सचिव आनंदराव सोनवणे, सर्कल संघटक नितीन रणदिवे, विभाग अध्यक्ष नाजिम पिंजारी, विभाग उपाध्यक्ष गौरव व्यास व सर्व तांत्रिक बंधू कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








