Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एक देश एक खत ‘ योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची, नवापुर तालुकाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन

team by team
October 21, 2022
in राजकीय
0
एक देश एक खत ‘ योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची, नवापुर तालुकाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन
नंदूरबार l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेली ‘एक देश एक खत’ ( प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना ) ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. या योजनेमुळे खत टंचाई होणार नाही. त्याचबरोबर किफायतशीर दरात खते उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात खर्चात मोठी बचतही होणार आहे.
शेतकऱ्यांच्या हिताची आणखी एक योजना सुरू केल्याबद्दल नवापुर तालुका भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष भरत गावित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे अभिनंदन केले आहे.
त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘ एक देश एक खत ‘ योजनेमुळे सर्व खते एकाच म्हणजे भारत ब्रँड या नावाने बाजारात उपलब्ध होतील. भारत युरिया, भारत डीएपी, भारत एनपीके या नावाने बाजारात खतांची विक्री होईल. एकाच ब्रँडची विक्री होणार असल्याने शेतकऱ्यांचा गोंधळ होणार नाही.
तसेच खते रास्त दरात उपलब्ध होतील. आपल्या उत्पादनाची विक्री वाढविण्यासाठी कंपन्या अनेक युक्त्या करीत असतात.त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.सर्वाधिक मागणीच्या खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचे प्रकारही घडतात.’एक देश एक खत’ या योजनेमुळे खतांचा मुबलक प्रमाणात पुरवठा होईल.
महत्वाची बाब म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांच्या खतांमधील घटक पदार्थाचे प्रमाण समान राहणार आहे डीएपी खताचे उत्पादन वेगवेगळ्या कंपन्यांनी केली तरी त्यातील नायट्रोजन आणि फॉस्फरसचे प्रमाण अनुक्रमे 18 आणि 46 टक्केच असले पाहिजे.असा नियम करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. तसेच मोदी सरकारने सुरू केलेल्या किसान समृद्धी केंद्रांमुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.या केंद्रांमध्ये खते, बियाणे,औषधी, औषधांची अवजारे यांची विक्री होईलच त्याचबरोबर माती, बियाणे आणि खतांचे परीक्षणही होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन तूर्त स्थगित

Next Post

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा : भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित यांचे आवाहन

Next Post
पालिकेच्या कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वी मागील वेतन व आगाऊ रक्कम द्यावी : भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावीत

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा : भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add