नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. येथील के.डी गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पथराई येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शरद पाटील होते .प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाद संदानशिव, भानुदास वळवी व ज्येष्ठ पत्रकार शांताराम पाटील उपस्थित होते.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.व मनोगतातून आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
प्रमुख अतिथी श्री. संदानशिव यांनी आपल्या मनोगतातून आपल्या जीवनात शिक्षकांचे असलेले महत्त्व स्पष्ट केले . तसेच ए आय आल्यानंतरही हाडामासाचा शिक्षकाचे महत्त्व कमी होणार नाही असे मत व्यक्त केले.
अध्यक्ष शरद पाटील यांनी डॉ.राधाकृष्णन यांचा जीवनप्रवास तसेच त्यांचे तत्त्वज्ञान सांगून शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने वापर केला पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कमलेश सोजल यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन रोहित पाटील व प्रा.कमलेश सोजल यांनी केले.








