Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

डॉ.महेंद्र रघुवंशी यांना राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार; नंदुरबारच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा

team by team
September 17, 2026
in शैक्षणिक
0
जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

नंदुरबार l प्रतिनिधी-

एखाद्या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावा, पाठपुरावा करावा आणि त्यानंतर सन्मान मिळावा, अशी नेहमीची चौकट यावेळी मात्र मोडीत निघाली. कामाची दखल घेत, कोणताही प्रस्ताव मागवून न घेता निवड झालेला सन्मान नंदुरबारच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी विशेष अभिमानाची बाब ठरली आहे. पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टट्यिूटच्यावतीने प्रदान करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्काराने जीटीपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र रघुवंशी यांचा गौरव करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक नेतृत्वाची राज्यस्तरावर पोहोचलेली दखल आणि नंदुरबारच्या शिक्षण क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 

 

पुण्यातील नऱ्हे, नवले ब्रीज, पुणे येथील प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलात, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टट्यिूटतर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विघ्नेश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास रांका ज्वेलर्सचे अध्यक्ष फत्तेचंद रांका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड.शार्दूलराव जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या सोहळ्यात राज्यभरात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या शिक्षण संस्था, कुलगुरू, प्राचार्य आणि प्राध्यापकांमधून एकाची निवड करुन त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांना आदर्श कुलगुरू पुरस्कार, मराठवाडा मित्र मंडळ, डेक्कन जिमखाना, पुणेचे अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना आदर्श संस्थापक पुरस्कार, तर सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.पराग सदगीर यांना आदर्श प्राध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्राचार्य डॉ.महेंद्र रघुवंशी यांनी महाविद्यालयातील गुणवत्ता वाढीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक प्राध्यापकाला विद्यार्थ्यांचे पालकत्व देण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

 

 

 

विद्यार्थ्यांशी शिक्षकांचा थेट संवाद वाढल्याने त्यांच्या शैक्षणिक तसेच वैयक्तिक अडचणी समजून घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे शक्य झाले. महाविद्यालयाच्या कार्यपद्धतीत नियोजनाला विशेष महत्त्व देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनात जीटीपी महाविद्यालयाने मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. सव्वा लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन महाविद्यालयाने केले असून त्यातून जवळपास सव्वासात लाख रुपयांहून अधिक महसूल महाविद्यालयाला प्राप्त झाला. या उत्पन्नातून महाविद्यालयात विविध शैक्षणिक व भौतिक सुविधा निर्माण करण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर योग्य नियोजन, इच्छाशक्ती आणि उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर केला तर विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करता येतात, हा संदेश त्यांच्या कार्यातून अधोरेखित झाला आहे.

 

 

प्राचार्य डॉ.रघुवंशी यांना यापूर्वीही कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या कडून आदर्श प्राचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच इंडो थाई शैक्षणिक संस्थेकडून उत्कृष्ठ प्राचार्य व प्रशासक पुरस्कार, कोल्हापूरच्या करिअर कट्ट्याकडून उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार लोकमत तर्फे नंदुरबार आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

 

 

 

ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य,विद्या परिषद सदस्य,अधिसभा सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तर आता नुकताच राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाल्याने संस्थेचे चेअरमन आमदार चंद्रकांत रघुवंशी, व्हा.चेअरमन मनोज रघुवंशी, संस्थेचे संचालक मंडळ, अधीक्षक पुष्पेंद्र रघुवंशी यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी कौतुक केले. त्यांच्या या यशामुळे जीटीपी महाविद्यालयासह जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add