नंदुरबार l प्रतिनिधी-
नांदरखे ता. नंदुरबार येथील वि जा भ ज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापिका
प्राप्ती पाटील व प्राथमिक मुख्याध्यापक सागर नामगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली आणि माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी शिकवण्याचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी सुंदर गाणी, भाषणे आणि कविता सादर केल्या.
मुख्याध्यापिका प्राप्ती पाटील यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांचे समाजातील महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या घडणीत त्यांचे असलेले योगदान यावर प्रकाश टाकला. श्री .नामगे यांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमातून शिक्षकांचे योगदान विद्यार्थी आणि पालक यांच्यासमोर अधिक स्पष्ट झाले. शिक्षक दिन साजरा करून शाळेने शिक्षणाच्या क्षेत्रात शिक्षकांचे मोल अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी केले. आभार भाग्यश्री मोरे यांनी मानले.
विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे आभार मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.. कार्यक्रम यशस्वी साठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले







