Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची यशस्वी सांगता

team by team
September 25, 2022
in राज्य
0
सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची यशस्वी सांगता
नंदुरबार  l
तालुक्यातील काकरदे येथे सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण ( १५०वर्ष) वर्षा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रपिता महात्मा जोतीराव गोविंदराव फुलें व्दारा लोकहितासाठी२४ सप्टेंबर १८७३ या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती.  स्त्री शिक्षण, तसेच जातिय कारणांमुळे शिक्षणा पासून वंचित असलेल्या बांधवांसाठी शिक्षणाची व्यवस्था करणे असो, विधवा पुनर्विवाह समर्थन, केशवपन विरोधी कार्य, बालहत्या प्रतिबंध करण्यासाठी कार्य, कृषक हितासाठी, श्रमिकांच्या हितासाठी कार्य, अंधश्रद्धा निर्मुलन, छत्रपती शिवजन्मोत्सव तसेच सकल मानव मुक्तीचे कार्य असे विविध कार्यांना सत्यशोधक समाज व्दारा लोक चळवळी चे स्वरुप मिळाले,
महात्मा फुले व सावित्रीआई फुले, व सत्यशोधक समाजामुळे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्रांती झाली.आधुनिक भारताच्या जडणघडणीत महात्मा फुले यांचे व सत्यशोधक समाजाचे महत्त्व पुर्ण योगदान आहे. यामुळेच महात्मा फुले यांना भारताचे शिल्पकार व राष्ट्रपिता म्हटले जाते.
 २४ सप्टेंबर २०२२ या दिवशी सत्यशोधक समाजाच्या निर्मितीस १५० वर्ष पुर्ण होत आहेत , छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श माननार्या सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्ताने जि.प. शाळा , सत्यशोधक समाज, शिवजन्मोत्सव समिती यांच्या व्दारा  काकरदे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन सकाळी ८ वाजेपासून करण्यात आले होते. कार्यक्रमाचे मुख्य आयोजन जिल्हा परिषद मराठी शाळा काकरदे येथे करण्यात आले होते.
प्रथमता काकरदे गावात प्रभात फेरी या वेळी काढण्यात आली, त्यानंतर जिजाऊ, शिवराय, महात्मा फुले व सावित्रीआई फुले तसेच बिरसा मुंडा व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर  महात्मा फुले व सावित्रीआई फुले यांच्या विचारांचा माहिती पर व्याख्यान चे आयोजन करण्यात आले होते.
याच बरोबर जि.प. शाळेच्या वतीने विद्यार्थीनी व विद्यार्थी यांच्या साठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच मिठाई वाटपाचे ही आयोजन करण्यात आले होते.
   या वेळी उपसरपंच किरण मराठे , राकेश माळी, पुंडलिक मराठे, विठोबा माळी, सोपानदेव कोळी, दगडु पवार, रविंद्र बागुल, भरत खैरनार यांची उपस्थिती होती.नारायण मराठे दिपक मराठे, अरविंद माळी, कन्हैयालाल मराठे, विनोद मराठे, यांच्या वतिने मिठाई वाटपासाठी आर्थिक सहकार्य करण्यात आले. कार्यक्रम चे सुत्रसंचलन विजय मराठे यांनी केले.तसेच प्रसिध्दी साठी शालिकग्राम ठाकरे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव रजाळे, कल्पना नेरकर, राजु राऊत, भिमसिंह वसावे या सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी विशेष कार्य केले.  सत्यशोधक समाज निर्मिती शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमामुळे काकरदे येथे आनंदाचे वातावरण दिसून आले.
बातमी शेअर करा
Previous Post

सत्यशोधक समाजाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर, ५१ रक्तदात्यांच्या सहभाग

Next Post

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे गौवंशांना लसीकरण मोहिमेचे आयोजन

Next Post
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे गौवंशांना लसीकरण मोहिमेचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे गौवंशांना लसीकरण मोहिमेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add