Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

team by team
August 7, 2026
in राजकीय
0
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

नंदुरबार l प्रतिनिधी-

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी धडगाव तालुक्यातील हजारो वनपट्टाधारक शेतकऱ्यांना सध्या प्रशासकीय विलंब आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनपट्टा केवायसी आणि फॉर्मर आय डी तयार होण्यास होत असलेल्या प्रचंड विलंबामुळे हे शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर प्रश्नाबाबत शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख गणेश रुपसिंग पराडके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, तातडीने योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

धडगाव तालुक्यातील सर्व पात्र वनपट्टाधारक शेतकऱ्यांचे वनपट्टा केवायसी युद्धपातळीवर आणि विनाविलंब पूर्ण करण्यात यावे.

ज्या शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना तातडीने फॉर्मर आयडी उपलब्ध करून देण्यात यावी,शासनस्तरावरून केवायसी व फॉर्मर आयडी मिळण्यास विलंब होत असल्यास, शेतकऱ्यांना वी के क्रमांकाच्या आधारे तात्पुरती केवायसी पूर्ण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याची विशेष मुभा देण्यात यावी.

धडगाव हा अत्यंत दुर्गम व आदिवासीबहुल तालुका असून येथील बहुतांश शेतकरी वनपट्टा जमिनीवर शेती करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. शासनाच्या या महत्त्वपूर्ण कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण करताना शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. वेळेत केवायसी आणि फॉर्मर आयडी न मिळाल्यास अनेक पात्र शेतकरी या योजनेपासून हुकण्याची भीती निर्माण झाली आहे.

शिवसेनेच्या वतीने स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर प्रशासनाने यावर तात्काळ पावले उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र लढा उभारला जाईल. त्यामुळे, शेतकरी हिताचा विचार करून जिल्हा प्रशासन आणि शासन स्तरावरून या प्रकरणात तातडीने लक्ष घालून सकारात्मक निर्णय घेतला जावा, अशी आग्रही मागणी गणेश रुपसिंग पराडके यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

Next Post

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

Next Post
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026
शासकीय कृषि महाविद्यालय, नंदुरबार येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट

शासकीय कृषि महाविद्यालय, नंदुरबार येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट

August 6, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबतच्या वक्तव्याचा नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर निषेध

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबतच्या वक्तव्याचा नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर निषेध

August 6, 2026
तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

August 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add