Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

team by team
August 8, 2026
in राज्य
0
नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार l प्रतिनिधी-

महाराष्ट्र शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आज एक मोठा टप्पा गाठण्यात आला. राज्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या सुमारे ६.२२ लाख पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर एकूण ₹५ हजार ०२८ कोटींची रक्कम थेट ऑनलाईन पोर्टलद्वारे हस्तांतरित करण्यात आली. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार ७७८ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹५९ कोटी २३ लाख २३ हजार ८६१ इतकी रक्कम थेट वर्ग करण्यात आली असल्याची माहिती सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक एस.वाय. पुरी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

राज्यातील ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयीकृत बँका आणि इतर खाजगी बँका अशा एकूण ५३ बँकांनी महाआयटीच्या पोर्टलवर शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती अपलोड केली असून, सुमारे ३२ लाख कर्जखात्यांचा डेटा संकलित झाला आहे. सहकार आयुक्त व निबंधक (पुणे) यांच्या माहितीनुसार २५ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या पात्र यादीत १६.९६ लाख शेतकऱ्यांचा समावेश होता, ज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील १७ हजार ५४३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत जिल्ह्यातील १० हजार ६०० कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

शासनाने सहकार आयुक्तांकडे २२ जुलै रोजी ₹१ कोटी आणि ३० जुलै रोजी ₹७,००० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. आज प्रत्यक्ष रक्कम हस्तांतरित झाल्यामुळे योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी तातडीने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व बँकांना देण्यात आले आहेत.

*ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन:*
पहिल्या पात्र यादीत नाव असूनही ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी (e-KYC) किंवा आधार प्रमाणीकरण प्रक्रिया अद्याप बाकी आहे, त्यांनी तात्काळ संबंधित बँक किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्राशी’ संपर्क साधून ई-केवायसी e-KYC पूर्ण करावी, जेणेकरून लाभ खात्यावर जमा होईल, असेही आवाहन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक श्री. पुरी यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add