तळोदा l
महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या कार्याला कृतिशील अभिवादन करण्यासाठी तळोदा शहरातील विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यावर्षी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष असून निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा सत्यशोधक समाजाचा वर्धापन दिन विविध पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.
सत्यशोधक समाज संघ नंदुरबार यांच्या पुढाकाराने तळोदा शहरातील संत सावता माळी भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते निसार अली मक्राणी होते.प्रमुख पाहुणे म्हणून कॉजेल ट्रस्टचे उपाध्यक्ष सुधीरकुमार माळी,देवमोगरा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चेतनकुमार पवार, माजी उपनगराध्यक्ष अनिल माळी,माळी समाज पंचचे ईश्वरलाल मगरे,सुरेश चव्हाण,हिरालाल कर्णकर,
जेष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी,प्राचार्य अजित टवाळे, सहयोग सोशल ग्रुपचे डॉ सुनिल लोखंडे,डॉ संदिप जैन,ॲड अल्पेश जैन, प्रगतीशील शेतकरी मित्तलकुमार टवाळे,घन:श्याम चौधरी,कुंभार ,समाजकार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधीकारी रामचंद्र परदेशी, मुस्लिम पिंजारी समाज अध्यक्ष जावेद टेलर,जमीर सत्तार,आदी उपस्थित होते.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष मनोगतात निसार मकरांनी यांनी तळोद्यात विविध सामाजिक उपक्रमांचे होणारे आयोजन आनंदाची बाब असून समाज सुधारकांच्या व सर्व धर्मांनी सांगितलेला मानवतेचा संदेश जनमानसांत रुजविले जात आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिराचे मुख्य संयोजक महाराष्ट्र सत्यशोधक समाज संघाचे विश्वस्त डॉ.डी.बी.शेंडे यांनी केले.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी नंदूरबार जिल्हा रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी जयेश सोनवणे,अधिपरिचारक विकास बागले, उपजिल्हा रुग्णालय तळोद्याचे डॉ कैलास ठाकरे, विशाल चौधरी, समुपदेशक प्रतीक बलसाने, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आनंद नाईक,श्रीमती राखी पारेख,श्रीमती शीतल पाटील,आरोग्य मित्र राहुल चव्हाण,एन के माळी,बाळू राणे,आदींनी परिश्रम घेतले.