नंदूरबार l प्रतिनिधी
लंम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता तालुक्यातील विखरण गावात “रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या” वतीने दुधाळ जनावरे व गौवंश यांना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले.
डॉ.तळेकर यांनी लंपी आजाराचे शेतकर्यांना मार्गदर्शन केले लसीकरण कार्यक्रमाच्या वेळी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष, रो.अनिल शर्मा रोटेरियन, रो.फकृद्दीन जलगांववाला] रो.डी.डी.साळुंके, रो.राहुल पाटील, रो.प्रवीण पाटील यांसह गावातील प्रथम नागरिक बापू विश्राम पाटील, संजय पाटील,रोहिदास मराठे,केशव पाटील व मान्यवर उपस्थित होते. डॉ.एम.जे. तळेकर,पशुधन विकास अधिकारी,नंदराज रायसिंग, विशाल पाटील यांचे वैद्यकीय सहकार्य लाभले तसेच दुधाळ जनावरांचे मालक आपल्या पशुधनासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी दोनशे जनावरांना लंम्पी स्किन प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात आले.