Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

team by team
August 7, 2026
in क्राईम
0
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

नंदुरबार l प्रतिनिधी-

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शहादा ते धडगाव रस्त्यावर तलावडी शिवार व उपनदेव फाट्या जवळ धाड टाकून 59 लाख 80 हजार रुपये किमतीचा अवैध गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला आहे. या धडक कारवाईत दोन महिंद्रा बोलेरो वाहने जप्त करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर एक चालक फरार झाला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक निरिक्षक व्ही. ए. चौरे यांनी कळविली आहे.

 

 

 

गुप्त माहितीनुसार, शहादा ते धडगाव रस्त्यावरून गोवा निर्मित मद्यसाठ्याची अवैध वाहतूक होणार असल्याची बातमी राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याआधारे दुय्यम निरीक्षक एस. एस. गोयेकर (भरारी पथक) व दुय्यम निरीक्षक अ. शां. गायकवाड (बीट क्र. 02) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तलावडी शिवार व उपनदेव फाट्याजवळ (दरा शिवार) सापळा रचला. संशयितरीत्या येणाऱ्या दोन महिंद्रा बोलेरो वाहनांना (एक वाहन क्र. एमएच-05-बीडी-507 व एक विना नंबर प्लेट) अडवून तपासणी केली असता, त्यात अवैध गोवा बनावटीच्या ‘रॉयल ब्लू मार्ट व्हिस्की’ चे 180 मि.ली. क्षमतेचे एकूण 470 बॉक्स लपवून ठेवल्याचे आढळले.

 

 

या कारवाईत रॉयल ब्लू मार्ट व्हिस्की (470 बॉक्स) व 2 महिंद्रा बोलेरो वाहने असा एकूण किंमत 59 लाख 80 हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी विनोद फुलजी मोरे (वय 30 वर्ष, रा. करणपुरा, ता. पानसेमल, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली.
दरम्यान दुसऱ्या वाहनाचा चालक फरार झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त (दक्षता व अंमलबजावणी) पी. पी. सुर्वे, नाशिक विभागाच्या उप आयुक्त श्रीमती यु. आर. वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व नंदुरबारचे प्रभारी अधीक्षक अ. सु. तांबारे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या कारवाईत निरीक्षक व्ही. ए. चौरे, दुय्यम निरीक्षक एस. एस. गोयेकर, अ. शां. गायकवाड, पी. व्ही. मोरे, एच. पी. घरटे तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक व जवानांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. एस. गोयेकर व अ. शां. गायकवाड करत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

Next Post

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

Next Post
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add