Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हयात गणरायाचे जल्लोषात आगमन, मानाच्या श्री.दादा व श्री. बाबा गणपतींचीही उत्साहात स्थापना

team by team
September 1, 2022
in राज्य
0
नंदुरबार जिल्हयात  गणरायाचे जल्लोषात आगमन, मानाच्या श्री.दादा व श्री. बाबा गणपतींचीही उत्साहात स्थापना
नंदुरबार | प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात गणरायाचे  ढोलताशांच्या गजरात, गुलालची उधळण करत जल्लोषात आगमन झाले. दोन वर्षानंतर प्रथमच मोठया प्रमाणावर जल्लोष करण्यात आल्याने उत्सव साजरा करत असल्याचा आनंद नागरिकांच्या चेहर्‍यावर दिसून आला.
यंदा शासनाने सर्व निर्बंध हटविले आहेत. परिणामी सण उत्सव जोमात साजरे होत आहे. दोन वर्षांनी प्रथमच मुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे.
त्यामुळे नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. गेल्या आठवडभरापासून जिल्हाभरातील गणेश मंडळांसह अनेक बालगोपाल घरगुती तसेच मंडळाच्या गणरायाच्या आगमनाच्या तयारीला लागले होते.
यंदा गणपतींच्या मुर्त्या काही प्रमाणात महाग असल्या तरीही भाविकांनी त्या खरेदी केली. दोन दिवसांपासून गणपती मुर्त्यांच्या खरेदीसाठी लगबग दिसून येत होती. खेडयापाडयातील नागरिकांनी ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो, रिक्षा, बैलगाडयांवर शहरी भागात येवून गणरायांच्या मुर्ती खरेदी केल्या व ढोलताशांच्या गजरात स्थापनेसाठी नेल्या.
बालगोपालांनी हातलॉरी, मोटरसायकल, तसेच हातात धरुन गणरायाला घरी आणले. काही मंडळांनी ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत मिरवणुकीने गणरायाची स्थापना केली.
जिल्हयात ८९८ मंडळांची स्थापना
जिल्हयात यावर्षी ८९८ गणेश मंडळांकडून श्रींची स्थापना करण्यात येणार आहे. यात ३४६ खाजगी गणपती तर २७८ सार्वजनिक गणपती आहे. ११० गावांमध्ये एक गांव गणपती संकल्पना राबविण्यात येत आहे.
मानाच्या दादा व बाबा गणपतीची स्थापना
नंदुरबार शहरातील प्रथम मानाचा श्री दादा गणपती व श्री. बाबा गणपतींचीही जल्लोषात स्थापना करण्यात आली. दोन्ही मानाच्या गणपतींना शेकडो वर्षांची परंपरा आहे. या गणपतींची विशेषतः म्हणजे, दोन्ही गणपतींची मुर्ती काळया मातीने ज्याठिकाणी स्थापना करण्यात येते, त्याच रथावर तयार करण्यात येते. यासाठी महिनाभराआधीच तयारी केली जाते. शेवटच्या दोन दिवसात त्यांच्यावर रंगरंगोटी करुन अखेरचा हात फिरविला जातो. एकुणच गणरायाच्या आगमनामुळे जिल्हाभरात उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

तापी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेले चार जण बुडाली, तिघांना वाचवण्यात यश, एक जण मात्र अद्याप बेपत्ता

Next Post

गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा राबविण्यात नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात दुसरा

Next Post
गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा  राबविण्यात नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात  दुसरा

गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा राबविण्यात नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात दुसरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add