Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एक गाव एक वाण अंतर्गत कृषि विभागामार्फत दहिंदुले येथे कापुस पिक शेतीशाळा

team by team
August 7, 2021
in कृषी
0
एक गाव एक वाण अंतर्गत कृषि विभागामार्फत दहिंदुले येथे कापुस पिक शेतीशाळा
नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले येथे एक गाव एक वाण अंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर , तालुका कृषि अधिकारी स्वप्निल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ कृषि अधिकारी सुनिल गांगरडे व शेतीशाळा प्रवर्तक तथा कृषि पर्यवेक्षक उमेश भदाणे यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत कापुस पिकाच्या शेतीशाळा वर्गाचे आयोजन करण्यात आले ,
दहिंदुले येथे आयोजीत कापुस पिक शेतीशाळेसाठी निवड करण्यात आलेल्या शेतक – यांची शेतीशाळेचा वर्ग  राजु देविदास मराठे यांच्या कापुस पिकाच्या शेतावर घेण्यात आला . सदर शेतीशाळेमध्ये कृषि सहाय्यक भरत माळी यांनी मागील शेतीशाळेच्या वर्गाची उजळणी व मागोवा घेवुन पुढील कार्यक्रमाची रुपरेषा मांडली . शेतीशाळा प्रवर्तक तथा कृषि पर्यवेक्षक उमेश भदाणे यांनी जिवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक व जिवामृत वापरावयाची पध्दत व जिवामृत वापराने होणारे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले . तसेच प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर कापुस पिकाची पिक परिसंस्था व रोग किडींची निरीक्षणे घेवुन मित्र किडींची व शत्रु किडींची ओळख , त्यांचा जिवनक्रम व शत्रु किडींचे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन बाबत सविस्तर मार्गदर्शन केले . तसेच कापुस पिकातील मुख्य शत्रु किड गुलाबी बोंडअळीची ओळख , गुलाबी बोंडअळीचा जिवनक्रम व तिचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले . तसेच शेतीशाळा प्रवर्तक तथा कृषि पर्यवेक्षक उमेश भदाणे यांनी शेतकर्‍याच्या संदेश वहन या सामुहिक खेळाचे आयोजन केले . सदर संदेश वहन या सामुहीक खेळात सर्व शेतकरी बांधवांनी उत्स्फूंतपणे सहभाग घेवुन खेळाचा आनंद घेतला . मंडळ कृषि अधिकारी सुनिल गांगरडे यांनी एकात्मिक पिक व्यवस्थापन व मका पिकातील लष्करी अळी व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहीती दिली . कृषि पर्यवेक्षक आर.सी.हिरे यांनी पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्याबाबत माहीती देवुन प्रात्यक्षिक सादर केले . सदर शेतीशाळा वर्गास बाजीराव मराठे , राजु मराठे , रमेश मराठे , शिवदास मराठे , उत्तम मराठे , एकनाथ मराठे , अश्विन माळी , उमाकांत पटेल , जगन न्हावी , हरीष मराठे , नंदलाल मोगल , अभिषेक माळी , राहुल माळी , पंढरीनाथ वाघ तसेच शेतकरी गटांचे प्रतिनिधी व प्रगतशील शेतकरी यांनी सहभाग घेतला . शेतीशाळा वर्गाचे सुत्रसंचालन कृषि सहाय्यक  भरत माळी यांनी केले , शेतीशाळा वर्गाचे आभार प्रदर्शन व कार्यक्रमाचा समारोप कृषि सेवक अक्षय वसावे यांनी केला .
बातमी शेअर करा
Previous Post

ग.तु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे 12 वी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश

Next Post

गावकर्‍यांनी पाठलाग करतात रेशन दुकानदार गाडी टाकुन फरार,पुरवठा विभाग कारवाई कधी करणार नागरीकांचा सवाल

Next Post
गावकर्‍यांनी पाठलाग करतात रेशन दुकानदार गाडी टाकुन फरार,पुरवठा विभाग कारवाई कधी करणार नागरीकांचा सवाल

गावकर्‍यांनी पाठलाग करतात रेशन दुकानदार गाडी टाकुन फरार,पुरवठा विभाग कारवाई कधी करणार नागरीकांचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

September 29, 2026
दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

September 29, 2026
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

September 28, 2026
सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी  निवड

सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी निवड

September 28, 2026
ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

September 28, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

September 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add