नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले येथे एक गाव एक वाण अंतर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर , तालुका कृषि अधिकारी स्वप्निल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ कृषि अधिकारी सुनिल गांगरडे व शेतीशाळा प्रवर्तक तथा कृषि पर्यवेक्षक उमेश भदाणे यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत कापुस पिकाच्या शेतीशाळा वर्गाचे आयोजन करण्यात आले ,
दहिंदुले येथे आयोजीत कापुस पिक शेतीशाळेसाठी निवड करण्यात आलेल्या शेतक – यांची शेतीशाळेचा वर्ग राजु देविदास मराठे यांच्या कापुस पिकाच्या शेतावर घेण्यात आला . सदर शेतीशाळेमध्ये कृषि सहाय्यक भरत माळी यांनी मागील शेतीशाळेच्या वर्गाची उजळणी व मागोवा घेवुन पुढील कार्यक्रमाची रुपरेषा मांडली . शेतीशाळा प्रवर्तक तथा कृषि पर्यवेक्षक उमेश भदाणे यांनी जिवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक व जिवामृत वापरावयाची पध्दत व जिवामृत वापराने होणारे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले . तसेच प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर कापुस पिकाची पिक परिसंस्था व रोग किडींची निरीक्षणे घेवुन मित्र किडींची व शत्रु किडींची ओळख , त्यांचा जिवनक्रम व शत्रु किडींचे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन बाबत सविस्तर मार्गदर्शन केले . तसेच कापुस पिकातील मुख्य शत्रु किड गुलाबी बोंडअळीची ओळख , गुलाबी बोंडअळीचा जिवनक्रम व तिचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले . तसेच शेतीशाळा प्रवर्तक तथा कृषि पर्यवेक्षक उमेश भदाणे यांनी शेतकर्याच्या संदेश वहन या सामुहिक खेळाचे आयोजन केले . सदर संदेश वहन या सामुहीक खेळात सर्व शेतकरी बांधवांनी उत्स्फूंतपणे सहभाग घेवुन खेळाचा आनंद घेतला . मंडळ कृषि अधिकारी सुनिल गांगरडे यांनी एकात्मिक पिक व्यवस्थापन व मका पिकातील लष्करी अळी व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहीती दिली . कृषि पर्यवेक्षक आर.सी.हिरे यांनी पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्याबाबत माहीती देवुन प्रात्यक्षिक सादर केले . सदर शेतीशाळा वर्गास बाजीराव मराठे , राजु मराठे , रमेश मराठे , शिवदास मराठे , उत्तम मराठे , एकनाथ मराठे , अश्विन माळी , उमाकांत पटेल , जगन न्हावी , हरीष मराठे , नंदलाल मोगल , अभिषेक माळी , राहुल माळी , पंढरीनाथ वाघ तसेच शेतकरी गटांचे प्रतिनिधी व प्रगतशील शेतकरी यांनी सहभाग घेतला . शेतीशाळा वर्गाचे सुत्रसंचालन कृषि सहाय्यक भरत माळी यांनी केले , शेतीशाळा वर्गाचे आभार प्रदर्शन व कार्यक्रमाचा समारोप कृषि सेवक अक्षय वसावे यांनी केला .