Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यात ‘आदिवासी समाजासाठी’ स्वतंत्र आयोग गठीत करा,ट्रायबल फोरमची मागणी

team by team
April 7, 2022
in राज्य
0
राज्यात ‘आदिवासी समाजासाठी’ स्वतंत्र आयोग गठीत करा,ट्रायबल फोरमची मागणी

म्हसावद l प्रतिनिधी
राज्यात ‘आदिवासी समाजासाठी’ स्वतंत्र आयोग गठीत करण्याबाबत चे निवेदन ट्रायबल फोरम नंदुरबार यांनी जिल्हाधिकारी
मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ नुसार केंद्रात पुर्वी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोग होता.८९ व्या घटनादुरुस्तीने अनुसूचित जाती व जमातीसाठी असे दोन स्वतंत्र आयोग निर्माण करण्यात आले.सन २००४ पासून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग ( अनुच्छेद ३३८) व अनुसूचित जमाती आयोग ( ३३८ अ ) नुसार गठीत झाले. राज्यात अल्पसंख्याक आयोग,राज्य मागासवर्गीय आयोग आहेत.महाराष्ट्र सरकारने २००५ मध्ये राज्य अनुसूचित जाती /जमाती आयोगाची स्थापना ,सामाजिक न्याय विभागाच्या एका शासन निर्णय द्वारे केली होती. अनु जाती/जमाती यांचेवरील अन्याय, अत्याचार दूर करणे, शैक्षणिक- सामाजिक -आर्थिक विकासाचे कार्यक्रम व योजना राबविण्याकडे लक्ष देणे, अधिकारी -कर्मचारी यांचेवर होणाऱ्या अन्याय प्रकरणात लक्ष घालून दूर करणे इत्यादी कामे व जबाबदारी आयोगावर सोपविण्यात आली होती. आघाडी सरकारच्या काळात २००५ मध्ये हा आयोग गठीत झाला होता.
महाविकास आघाडी सरकार २०१९ मध्ये सत्तेत आल्यावर जुलै २०२० मध्ये राज्याचा अनुसूचित जाती /जमाती आयोग बरखास्त करण्यात आला .सरकारने अजूनही अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाची पुनर्रचना केलेली नाही. त्यावर नियुक्त्या झाल्या नाहीत. वर्ष झाले आहे. खरं तर भारत सरकारच्या स्तरावर अनुसूचित जातीच्या प्रश्नांसाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे.अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आहे.महाराष्ट्रात मात्र अनु.जाती/जमातीसाठी एकच आयोग आहे.त्यामुळे अनुसूचित जमातींच्या व्यक्तींना आयोगावर प्रतिनिधीत्व मिळत नाही.अनुसूचित जमातीचे अनेक प्रश्न व समस्या आहेत.हा समाज घटक अजूनही मूलभूत गरजा व मूलभूत सोयी सुविधापासून वंचित आहेत.आदिवासींच्या शैक्षणिक , सामाजिक,आर्थिक ,सांस्कृतिक विकास योजना व कार्यक्रम अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे. अनुसूचित जमातीच्या कल्याणाचे बजेट पूर्णपणे खर्च होत नाही. अखर्चिक निधी फार मोठा आहे.शिष्यवृत्ती,परदेश शिष्यवृत्ती, होस्टेलस् सेवा-सुविधा, घरकुल योजना, अनुशेष भर्ती, अँट्रोसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, घटनात्मक हक्काच्या शासन सेवेतील गैर आदिवासींनी बळकावलेल्या जागा असे अनेक विषय आहे. म्हणून अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग असावा.स्वतंत्र आयोग झाल्यास आदिवासींना संधी मिळेल, अनुसूचित जमातींच्या समस्यांचे , होणाऱ्या अन्याय अत्याचारांचे स्वतंत्र निरसन होण्यास मदत होईल. आतापर्यंत गेल्या पंधरा वर्षात राज्यात एकाही आदिवासी महिलेची राज्याच्या अनु.जाती/जमाती आयोगावर नियुक्ती झाली नाही. ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला चिंतनीय आहे. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी वेगवेगळे आयोग गठीत करावेत आणि आयोगावरील अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती जाहिराती देऊन आलेल्या पात्र अर्जदारातून, इमानदार,समाजाभिमुख स्वाभिमानी उमेदवारांची,निःपक्षपाती नियुक्ती व्हावी. महिलांचा सहभाग निश्चितपणे करण्यात यावा. असे निवेदन ट्रायबल फोरम नंदुरबार चे जिल्हाध्यक्ष नितीन तडवी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश वळवी,तेजस पाडवी,जिल्हा महासचिव दशरथ तडवी,जिल्हा सचिव रविंद्र वळवी, जिल्हा कोषाध्यक्ष वसंत वसावे,जिल्हा संघटक अनिल वसावे,अक्कलकुवा
तालुकाध्यक्ष सिमादादा तडवी, मनिष वळवी, अनिल वळवी आदि उपस्थित होते.निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंवत्री, मंत्री सामाजिक न्याय विभाग,मंत्री आदिवासी विकास विभाग,मुख्य सचिव यांना देण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मोदलपाडा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेण्याचे अँड. पद्माकर वळवी यांचे आवाहन

Next Post

तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next Post
तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add