Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रेम प्रकरणातून गळफास घेतलेल्या अनोळखी युवकाची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

team by team
March 27, 2022
in क्राईम
0
प्रेम प्रकरणात धोका मिळाला असे लिहून बस स्थानकात युवकाने केली आत्महत्या

नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव येथील बसस्थानक आवारातील प्रवासी शेडच्या लोखंडी अँगलला कापडी पट्टा व नॉयलॉनची पांढरी पट्टी बांधून २३ वर्षीय अनोळखी युवकाने एकतर्फी प्रेम प्रकरणातून गळफास घेतल्याची घटना घडली. सदर घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून युवकाची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धडगाव येथील बसस्थानकातील शेडमध्ये काल दि.26 मार्च रोजी सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास काही प्रवासी आल्यानंतर त्यांना प्रवाशांसाठीच्या शेडमध्ये लोखंडी ॲँगलला एका युवकाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. यामुळे ते बसस्थानक आवाराबाहेर येवून त्यांनी परिसरात असणाऱ्या नागरिकांना याबाबत माहिती दिली. यावेळी हॉटेल व्यावसायिक गोपाल सुधाकर मोरे यांनी पोलिसांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. बसस्थानकातील प्रवासी शेडमध्ये युवकाने गळफास घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक गौकुळ औताडे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सुमारे २३ वर्षीय युवकाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी असलेल्या दगडी फरशीवर खडूने एका मुलीच्या नावाने उद्देशून त्याने प्रेमासंबंधी मजकूर लिहिला आहे व एकतर्फी प्रेम प्रकरणातून गळफास घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर अनोळखी युवकाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, बसस्थानकाच्या प्रवासी शेडमध्येच गळफास घेतल्याने धडगाव परिसरात सकाळी एकच खळबळ उडाली होती. याबाबत गोपाल मोरे यांच्या खबरीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ.राजेंद्र जाधव करीत आहेत.दरम्यान फरशीवरील मजकूरात मयत युवकाने आत्महत्येचे कारण नमूद केले असून मुलीच्या नावाचाही उल्लेख केला आहे. यासोबतच ‘अर्जून’ असे नाव लिहिले आहे. तर त्याच्या डाव्या हाताच्या पंजावर ‘ए’ असे गोंधलेले आहे. हातात स्टिलचा कडा व एका हातात मनगटावर मण्यांची माळ गुंडाळलेली दिसून आली आहे. सदर अनोळखी युवकाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

एसटीची सेवा तातडीने सुरू करण्याची पुरोगामी संघटनांची साद

Next Post

धडगाव बसस्थानकात आत्महत्या केलेल्या तरुणाची ओळख पटली, त्याच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती धक्कादायक

Next Post
प्रेम प्रकरणात धोका मिळाला असे लिहून बस स्थानकात युवकाने केली आत्महत्या

धडगाव बसस्थानकात आत्महत्या केलेल्या तरुणाची ओळख पटली, त्याच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती धक्कादायक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add